‘हायब्रिड वॉरफेअर’च्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलंडकडून बेलारुस सीमेवर ‘मेटल वॉल’ची उभारणी

वॉर्सा/मिन्स्क – रशियासमर्थक बेलारुसकडून ‘हायब्रिड वॉरफेअर’चा वापर होण्याचा धोका लक्षात घेऊन पोलंडने बेलारुस सीमेवर ‘मेटल वॉल’ उभारण्यास सुरुवात केली आहे. जवळपास ११५ मैल लांबीची सुरक्षा भिंत उभारण्यात येणार असून त्यावर थर्मल कॅमेरे, मोशन सेन्सर्स तसेच अलार्मस् लावण्यात येतील, अशी माहिती पोलंडच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. जून महिन्यापर्यंत मेटल वॉलच्या उभारणीचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येते.

‘हायब्रिड वॉरफेअर’च्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलंडकडून बेलारुस सीमेवर ‘मेटल वॉल’ची उभारणीगेल्या काही महिन्यात रशिया-युक्रेन सीमेवर असलेला तणाव अधिकच चिघळत असून बेलारुसने रशियाला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. रशियाची लढाऊ विमाने, बॉम्बर्स, क्षेपणास्त्र यंत्रणा यांच्यासह लष्करी तुकड्याही बेलारुसमध्ये दाखल झाल्याचे समोर आले आहे. रशिया बेलारुसचा वापर करून युक्रेनवर हल्ला चढविल, असे दावेही करण्यात आले आहेत. त्याचवेळी रशिया बेलारुसचा वापर करून युरोपला अस्थिर करण्याचे प्रयत्न करेल, असेही मानले जाते.

‘हायब्रिड वॉरफेअर’च्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलंडकडून बेलारुस सीमेवर ‘मेटल वॉल’ची उभारणीबेलारुसने गेल्या वर्षी पोलंड व लिथुआनियात मोठ्या प्रमाणात निर्वासित घुसविले होते. त्यानंतर पोलंड व लिथुआनिया या दोन्ही देशांनी सीमेवरील सुरक्षाव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाडविली होती. पोलंडने सीमाभागात आणीबाणीचीही घोषणा केली होती. लिथुआनियाने आपल्या सीमाभागात तारांचे कुंपण उभारण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलंडने आता त्यापुढे जात बेलारुसबरोबरील सीमेवर मेटल वॉलची उभारणी सुरू केली आहे. ही भिंत तब्बल १८ फूट उंचीची असेल व त्यासाठी सुमारे ४० कोटी डॉलर्स खर्च येईल, असे सांगण्यात येते. ‘हायब्रिड वॉरफेअर’च्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलंडकडून बेलारुस सीमेवर ‘मेटल वॉल’ची उभारणीया मेटल वॉलचे बांधकाम सुरू झाल्याची माहितीही पोलंडच्या सूत्रांनी दिली.

पोलंडच्या सुरू केलेल्या या वॉलच्या बांधकामामागे बेलारुसमधून घुसविण्यात येणार्‍या निर्वासितांच्या लोंढ्याचा धोका हे प्रमुख कारण ठरले आहे. या लोंढ्याच्या माध्यमातून बेलारुस युरोपविरोधात हायब्रिड वॉरफेअर खेळत असल्याचा दावा युरोपिय महासंघाकडून करण्यात येतो. पोलंडनेही त्याला दुजोरा दिला आहे. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी या मुद्यावर सातत्याने धमकावल्याकडेही युरोपिय देशांनी लक्ष वेधले आहे.

leave a reply