इराकमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेवरुन अमेरिका, तुर्कीमध्ये वादावादी

इस्तंबूल/वॉशिंग्टन – इराकच्या उत्तरेकडील भागात दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमधून दहशतवादी प्रवास करीत होते व अमेरिका सदर हेलिकॉप्टरमधून दहशतवाद्यांची ने-आण करीत होती, असा आरोप तुर्कीने केला आहे. पण इराकमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कुर्द बंडखोरांच्या मुद्यावरुन अमेरिका व तुर्कीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

इराकमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेवरुन अमेरिका, तुर्कीमध्ये वादावादीगेल्या आठवड्यात इराकच्या उत्तरेकडील भागात लष्करी हेलिकॉप्टर कोसळले. इराकमधील कुर्दिस्तानच्या दुहोक भागात ही घटना घडली. यामध्ये ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’ या संघटनेचे पाच कुर्द बंडखोर होते. तर ‘युरोकॉप्टर एएस३५०’ या लष्करी हेलिकॉप्टरने हे बंडखोर प्रवास करीत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका व नाटोचे इतर सदस्य देश पीकेकेचा उल्लेख कुर्द बंडखोर संघटना म्हणून करतात. तर तुर्कीने पीकेकेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

त्यामुळे नाटोकडून वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधून कुर्द बंडखोर प्रवास करीत असल्याचे उघड झाल्यामुळे तुर्की खवळला आहे. गेली काही वर्षे अमेरिका व इराक छुप्यारितीने पीकेकेच्या दहशतवाद्यांची तस्करी करीत होते, असा आरोप तुर्कीने केला आहे. तर सिरियातील कुर्द बंडखोरांकडून वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर्सबाबत अमेरिकेला काहीही माहिती नाही, असे पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल पॅट रायडर यांनी म्हटले आहे. मात्र या घटनेमुळे अमेरिका व तुर्कीतील वाद नव्याने चव्हाट्यावर आला आहे.

हिंदी

 

leave a reply