इराणपासून इस्रायली पर्यटकांना धोका

- इस्रायलचा इशारा

जेरूसलेम – आखात आणि भूमध्य समुद्राजवळील देशांमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इस्रायली नागरिकांना इराणच्या दहशतवादी हल्ल्यांचा धोका आहे. या इस्रायली पर्यटकांनी सावधपणे आणि जबाबदारीने प्रवास करावा, असा इशारा इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने प्रसिद्ध केला. युएई, तुर्की, इजिप्त, बाहरिन, अझरबैजान आणि जॉर्जिया या देशांमध्ये इस्रायलींवर हल्ले होऊ शकतात, असे इस्रायलने म्हटले आहे.

इराणपासून इस्रायली पर्यटकांना धोका - इस्रायलचा इशाराआखात आणि भूमध्य समुद्राजवळील देशांमध्ये ज्यू तसेच इस्लामधर्मियांच्या पवित्र सणाच्या निमित्ताने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, इस्रायली नागरिक मोठ्या संख्येने आखाती तसेच शेजारी देशांमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. पण इस्रायलवर सूड उगविण्यासाठी इराण ज्यूधर्मिय तसेच इस्रायली पर्यटकांना लक्ष्य करू शकतो, अशी भीती इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने वर्तविली आहे. पण इस्रायली पर्यटकांनी संबंधित देशांचा दौरा टाळावा, अशी सूचना करण्याचे इस्रायलने टाळले. याउलट इस्रायली पर्यटकांनी परदेशात अधिक सावध रहावे आणि जबाबदारीने कामगिरी पार पाडावी, असे आवाहन इस्रायलने केले आहे.

leave a reply