कोरोनाव्हायरसची निर्मिती प्रयोगशाळेत झाली

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली – ”कोरोनाचा विषाणूची उत्पत्ती नैसर्गिक नाही, तर हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला आहे. त्यामुळे सारे काही अनपेक्षित घडत आहे. जगभरातील संशोधक त्यावर लस शोधत आहेत. लस तयार झाल्यावर सर्व काही ठीक होईल. मात्र तोपर्यंत आपण या विषाणूंसोबत जगण्याची कौशल्य आत्मसात करायला हवे. आपला देश गरीब असून महिनोंमहिने लॉकडाऊन चालू ठेवणे आपल्याला परवडणारे नाही. कोरोनाव्हायरसबरोबर लढणे गरजेचेच आहे, पण त्याबरोबर आपण आर्थिक युद्धही देखील लढत आहोत”, असे असे केंद्रीय परिवहन, तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) सेक्टरसाठी पॅकेजची घोषणा केली. त्यासंदर्भांत एका वृत्त वाहिन्यांशी बोलताना गडकरी यांनी कोरोनाची उत्पत्ती प्रयोगशाळेत झाल्याचा दाखल दिला.

कोरोनाव्हायरसच्या साथीशी लढत असताना देशाच्या अर्थकारणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ठासून सांगितले. आवश्यक ती खबरदारी घेऊन देशाच्या अर्थकारणाला चालना दिल्याखेरीज गत्यंतर नाही. कारण कोरोनाव्हायरसची साथ कधी संपुष्टात येईल, त्याबद्दल कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. कोरोना हा नैसर्गिक विषाणू नसून त्याची निर्मिती प्रयोगशाळेत झालेली आहे त्यामुळे याबाबत निश्चित असे काहीही सांगता येणे शक्य नाही असे सांगून नितीन गडकरी यांनी हळूहळू लॉकडाऊन मागे घेण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले.

गडकरी यांनी कोरोनाव्हायरसबाबत केलेले हे विधान भारतीय माध्यमांनी उचलून धरले आहे. कोरोनाव्हायरसची निर्मिती चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत झाली असे अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलियासारखे देश ठासून सांगत आहेत. चीनच्या बेजबाबदारपणामुळे ही साथ जगभरात पसरली, असा आरोप करून अमेरिकेने इतर देशांबरोबर राजनैतिक आघाडी उघडून चीनकडे नुकसान भरपाई वसूल करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आतापर्यंत भारताने याबाबत चीनवर दोषारोप करण्याचे टाळले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कोरोनाव्हायरस मानवनिर्मित असल्याचे सांगून प्रयोगशाळेतच याची निर्मिती झाल्याचे केलेले विधान चीनवर दडपण टाकण्यासाठी पुरेसे ठरते.

भारताच्या सीमेत घुसखोरी करून, तसेच पाकिस्तान सारख्या देशाला सहाय्य करून चीन भारतावरील दडपण वाढवू पाहत आहे. त्याचवेळी चीनमधून बाहेर पडणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक गुंतवणूकीसाठी उत्सुक आहेत, ही बाब देखील चीनला खटकत आहे. अशा परिस्थितीत शक्य त्या मार्गाने भारतावर दबाव आणण्याचे चीनचे प्रयत्न चीनकडून केले जात आहेत. अशा काळात कोरोनाव्हायरसबाबत पाश्चिमात्य देशांकडून सुरू असलेल्या आरोपांना भारताने दुजोरा दिला, तर त्याचे फार मोठे परिणाम चीनला सहन करावे लागतील असे संकेत गडकरी यांच्या विधानातून मिळत आहेत.

leave a reply