‘सीआरपीएफ’ जम्मू-काश्मीरमध्ये २९ कायमस्वरूपी छावण्या उभारणार  

श्रीनगर –   जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानच्या सुरु असलेल्या कुरापती पाहता  ‘सीआरपीएफ’ जम्मू-कश्मीरमध्ये २९ कायम स्वरूपी छावण्या उभारणार आहे. यासाठी  ठिकाणांची निवड करण्यात आली  असून जम्मू-कश्मीर प्रशानाकडे या जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

छावण्या

गेल्यावर्षीपर्यंत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे  कलम ३७० आणि यातील आर्टिकल ‘३५ ए’मुळे बाहेरील कोणालाही जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदीचे अधिकार नव्हते. या कायद्यामुळे  संरक्षणदलांना देखील छावण्या आणि तळांसाठी जमीन संपादन करता येत नव्हती. त्यांना भाडेपट्टीवर जमीन उपलब्ध करून दिली जात असे. मात्र आता ३७० कलम हटविल्यामुळे सुरक्षादलांना कायस्वरूपी छावण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सीआरपीएफचे जम्मूमध्ये नऊ आणि काश्मीरमध्ये २० कॅम्प प्रस्तावित आहेत. यामध्ये जम्मूमधील रामबन जिल्ह्यात जागेचा समावेश आहे. सीआरपीएफने यासाठी ४१.७७ एकर जमीन मागितली आहे. यासह कठुआ, जम्मू, उधमपूर, डोडा, रियासी आणि राजौरी येथे देखील जागा मागण्यात आली आहे. तसेच श्रीनगर, बुडगाम, गांदरबल, बांदीपोरा, बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, कुलगाम, पुलवामा आणि शोपियनमध्ये जागेचाही प्रस्ताव देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालयाची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या केंद्र शासित प्रदेश आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

leave a reply