अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बायडेन प्रशासनावर गंभीर आरोप

माजी राष्ट्राध्यक्षवॉशिंग्टन – अमेरिका हा गुन्हेगारीत बरबटलेला देश बनला असून ‘एमएस-13′ सारख्या गुन्हेगारी टोळ्या व अंमली पदार्थांचा व्यापार करणारे तस्कर यांचा धुडगूस सुरू असल्याचा आरोप माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर ट्रम्प यांनी प्रथमच राजधानी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होऊन बायडेन प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी अमेरिकेतील बेघर नागरिकांचा मुद्दा उपस्थित करून शहराबाहेरील छावण्यांमध्ये त्यांची सोय करता येईल, असे सुचविले आहे.

अमेरिका फर्स्ट पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या कार्यक्रमात बोलताना म्प यांनी बायडेन प्रशासनाच्या धोरणांवर जोरदार हल्ले चढविले. ‘एमएस-13′ या गुन्हेगारी टोळीच्या कारवायांमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन निर्वासितांना मोकळे रान देऊन गुन्हेगारी टोळ्यांना अधिक प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप माजी राष्ट्राध्यक्ष म्प यांनी केला. संसदेतील रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी गुन्हेगारी, महागाई व अमेरिकन सीमांची सुरक्षा या मुद्यांवरील सुधारणा मंजूर करून घेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही ट्रम्प यांनी केले. ज्या भागांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, अशा भागांमध्ये ‘नॅशनल गार्ड’ची तैनाती करायला हवी, अशी मागणी माजी राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केली.

माजी राष्ट्राध्यक्षव्हाईट हाऊसमध्ये अशी व्यक्ती बसली आहे, जी काहीच काम करत नाही; पण घाबरू नका लवकरच मदत येते आहे’, अशा शब्दात 2024 सालच्या निवडणुकीसाठी आपण उमेदवार असू असे संकेतही त्यांनी दिले. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उमेदवारीबद्दल अजूनही अनेक तर्क-वितर्क लढविले जात असून त्यांनी स्पष्ट शब्दात यासंदर्भात घोषणा केलेली नाही. मात्र यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीतील उमेदवारांसाठी म्प यांच्याकडून प्रचार सुरू आहे. त्यांचे यशापयश व अमेरिकी संसदेकडून कॅपिटलवरील हल्ल्यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीच्या निकालावर अवलंबून असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply