डोनाल्ड ट्रम्प इराणपासून सुरक्षित राहू शकणार नाहीत

- इराणच्या नेत्यांची धमकी

सुरक्षित

तेहरान – ‘कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी यांची हत्या घडविणारे किंवा त्यांच्या हत्येचे आदेश देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लवकरच सूड घेऊ. ते पृथ्वीवर कुठेही सुरक्षित राहणार नाहीत’, अशी गंभीर धमकी इराणच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकेतही लक्ष्य केले जाईल, असेही इराणने धमकावले.

इराणच्या कुद्स फोर्सेसचे माजी प्रमुख कासेम सुलेमानी यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना इराणच्या विधी विभागाचे प्रमुख इब्राहिम रईसी यांनी सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यात येईल, असे पुन्हा एकदा धमकावले.सुरक्षित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुलेमानी यांच्या हत्येचे आदेश दिले होते, असा आरोप करून रईसी यांनी ट्रम्प यांना पृथ्वीवर कुठेही सुरक्षित स्थान मिळणार नसल्याचा दावा केला.

तर सुलेमानी यांचे उत्तराधिकारी असलेले ब्रिगेडिअर जनरल इस्माईल गनी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेतच हल्ले होतील, असे जाहीर केले. संतापलेली अमेरिकेतील स्वातंत्र्यप्रेमी जनताच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्यांच्या गुन्हाची शिक्षा दिल्यावाचून राहणार नाही, असा दावा गनी यांनी केला आहे.

गेल्या वर्षी गनी यांनीच सुलेमानी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या प्रत्येक अमेरिकी अधिकार्‍याचा मुडदा पाडण्याची धमकी दिली होती.

leave a reply