इस्रायलच्या सिरियावरील क्षेपणास्त्रहल्ल्यात पाच जणांचा बळी

दमास्कस/जेरुसलेम – इस्रायलने सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये केलेल्या क्षेपणास्त्रहल्ल्याच पाच जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सिरियाच्या सरकारी माध्यमांनी इस्रायलने अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या लष्कराने या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Israel's missileशनिवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी राजधानी दमास्कसच्या मध्यवर्ती भागात क्षेपणास्त्रे डागली. यातील ‘कफ्र सौसा’ भागात झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. या भागात इराण व इराणचे समर्थन करणाऱ्या गटांशी निगडीत उपक्रमांची कार्यालये असल्याचे सांगण्यात येते. २००८ साली याच भागात झालेल्या स्फोटात हिजबुल्लाहचा कमांडर इमाद मोगनियेह मारला गेला होता.

सिरियन माध्यमांनी दिलेल्या माहितीत इस्रायलच्या क्षेपणास्त्रहल्ल्यात अनेक इमारती व घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. हल्ल्यातील बळी तसेच जखमींची संख्याही मोठी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात इस्रायलने सिरियातील इराणचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आक्रमक हल्ल्यांची मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इस्रायलने राजधानी दमास्कसमधील विमानतळाला लक्ष्य केले होते. विमानतळानजिक इराणी शस्त्रांचा साठा असलेले एक गोदाम लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात राजधानी दमास्कसमध्ये घडविलेल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी कर्नल दावोद जाफरी यांचा बळी गेला होता.

हिंदी

leave a reply