युएईच्या हवाई सुरक्षेसाठी फ्रान्स सहाय्य करणार

युएईच्या हवाई सुरक्षेसाठीपॅरिस – येमेनमधील हौथी बंडखोरांच्या ड्रोन्स आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या युएईच्या हवाई सुरक्षेसाठी सहाय्य करणार असल्याची घोषणा फ्रान्सने केली. त्याचबरोबर हवाई टेहळणीसाठी युएईला सहाय्य करण्यासाठी अबु धाबी येथे तैनात आपली रफायल विमाने वापरण्याचे फ्रान्सने जाहीर केले आहे. फ्रान्सची ही घोषणा लक्षवेधी ठरते.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्स आणि युएईमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण विषयक करार पार पडला. यानुसार फ्रान्स युएईला ८० रफायल विमाने पुरविणार आहे. या संरक्षण सहकार्य अंतर्गतच फ्रान्सने युएईला हवाई सुरक्षा पुरवण्याचे जाहीर केले आहे. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पर्ली यांनी सोशल मीडियातून ही माहिती जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून युएईवर होत असलेल्या हल्ल्यांवर फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी सडकून टीका केली.

युएईच्या हवाई सुरक्षेसाठी‘गेल्या काही दिवसांपासून युएई हा दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष ठरत आहे. या संघर्षात युएर्ईला सहाय्य करण्यासाठी फ्रान्स तयार आहे. युएई हा फ्रान्सचा धोरणात्मक सहकारी देश असून त्यांना लष्करी तसेच हवाई सुरक्षा पुरवण्यासाठी फ्रान्स तयार आहे’, असे फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केले. ‘रफायल लढाऊ विमाने सध्या अबु धाबी येथे तैनात आहेत. आवश्यकता असल्यास ही विमाने युएईच्या लष्कराला टेहळणी तसेच हवाई हल्ल्यांसाठी मदत करतील’, असे फ्रान्सच्या संरक्षणमंत्री म्हणाल्या.

युएईला रफायल विमानांची हवाई सुरक्षा पुरविण्याची फ्रान्सची ही घोषणा लक्षवेधी ठरत आहे. काही तासांपूर्वीच हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांचा दाखला देऊन बायडेन प्रशासनाने सौदी अरेबिया आणि युएईसाठी याआधी रोखलेले सहाय्य मार्गी करण्याचे जाहीर केले होते.

leave a reply