कॅनडामध्ये माथेफिरूच्या हल्ल्यात १६ जण ठार

कॅनडामध्ये माथेफिरूच्या हल्ल्यात १६ जण ठार

नोव्हा स्कॉटिया – कॅनडाच्या नोवा स्कॉटिया प्रांतात एका माथेफिरूने बेछूट गोळीबार करून घडवलेल्या भीषण हत्याकांडात १६ जणांचा बळी गेला आहे. हा माथेफिरुदेखील पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. एखाद्या माथेफिरूने कॅनडात घडविलेला हा सर्वात भीषण हल्ला ठरला आहे.
पोर्टापिक नावाच्या गावात काही दिवसांपूर्वीच राहायला आलेल्या ग्रॅबियल वॉर्टमॅन याने हे भीषण हत्याकांड घडविले. तो डेंटिस्ट असून पोलिसांचा गणवेश परिधान करून त्याने हा गोळीबार केल्याचे सांगितले जाते. पोर्टापिक गावात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मृतदेह पडलेले दिसले, याचा तपास करीत पोलीस गेब्रियल पर्यंत पोहोचले.

चेकपोस्टवरील पोलिस अधिकाऱ्यांना ठार करून गॅब्रियलने त्याचा गणवेश परिधान केला, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्था देत आहेत. गॅब्रियलने घडविलेल्या या भयंकर हत्याकांडाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. गॅब्रियलने या हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला व तब्बल बारा तासांनी त्याच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यानंतर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत गॅब्रियल मारला गेला.

गॅब्रियलने घडवलेल्या हत्याकांडाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र कॅनडामधील माथेफिरूने केलेल्या हल्ल्यांपैकी गॅब्रियलने केलेले हे हत्याकांड सर्वात भीषण ठरले आहे.

leave a reply