झारखंडमध्ये स्फोटकांचा प्रचंड साठा जप्त

पाकूर (झारखंड) – झारखंडच्या पाकूरमधील हिरणपूर भागातून अमोनियम नायट्रेटचा प्रचंड साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या स्फोटकांच्या साठ्यासह एक व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्फोटक

पोलिसांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे कारवाई हाती घेत १०० किलो उच्च क्षमतेचे अमोनियम नायट्रेट, जिलेटिनच्या ४०० काड्या अनु दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असल्याचे पाकूरचे पोलिस अधीक्षक मनिलाल मंडल यांनी सांगितले.

मणीरुल शेख असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील नल्हती येथील रहिवासी आहे. बिहारमध्ये निवडणूक पार पडणार असून त्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा मागवण्यात आला होता. या साठा कोणी मागवला होता, कोणत्या ठिकाणाहून मागविण्यात आला या प्रश्नांचा खुलासा चौकशीनंतर होऊ शकेल,असे मंडल म्हणाले.

leave a reply