भारताची युरोपीय महासंघाबरोबर मुक्त व्यापारी करारावर चर्चा

नवी दिल्ली – भारताने युरोपीय महासंघाबरोबर मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरु केली आहे. तसेच ब्रिटनबरोबर मुक्त व्यापारी करारासाठी चर्चेस भारत तयार आहे. ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार करण्याआधी ‘प्रिफरेन्शिअल ट्रेड एग्रीमेंट’ (पीटीए) करण्याची भारताची तयारी असल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले.

India-UNकोरोनाव्हायरसच्या संकटानंतर चीनवरोधात जगभरात प्रचंड रोष असून प्रमुख देश आपल्या अर्थव्यस्थेवर वाढलेला चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी पावले उचलत आहेत. ऑस्ट्रोलिया व यूरोपीय देशांमध्ये तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. भारतही परकीय गुंवणूकदारांना आकर्षित कारण्याबरोबर देशातील निर्यातदारांना नव्या व्यापारी संधी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली करीत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी ‘युरोपीय महासंघ’ आणि ‘ब्रिटन’बरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी सुरु केलेल्या हालचालींची दिलेली माहिती महत्वाची ठरते.

युरोपीय महासंघाबरोबर ‘एफटीए’वर चर्चा सुरु झाली आहे. महासंघाच्या व्यापार आयुक्तांबरोबर आपली चर्चा झाली असून लवकरात लवकर करार होईल, अशी अपेक्षा असल्याचे गोयल म्हणाले. विविध मुद्दयांवर चर्चेसाठी भारताची तयारी आहे. ब्रिटनबरोबर ‘एफटीए’ करण्याचे अंतिम ध्येय ठेऊन सुरुवातीला ‘ प्रेफशनल ट्रेड अ‍ॅग्रीमेंट’ अर्थात ‘पीटीए’ करण्याची आणि याद्वारे चर्चेला प्रारंभ करण्याचीही भारताची तयारी असल्याचे, गोयल यांनी अधोरेखित केले.

आता पुढील गोष्टी युरोपीय महासंघ आणि ब्रिटनने अवलंबून आहे. त्यांना निर्णय घ्यायचा आहे. भारताने कोणतीही ‘रेड लाईन’ आखलेली नाही. औषध, कपडे, औद्योगिक यंत्रे, फर्निचर सारख्या क्षेत्रापासून ब्रिटनबरोबर भारताचा व्यापार वाढू शकतो, असे वाणिज्य मंत्र्यांनी म्हटले आहे.

भारत आणि युरोपीय महासंघामध्ये याआधी ‘एफटीए’ कारासंदर्भांत दीर्घ वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या. सहा वर्ष चाललेल्या चर्चेनंतर २०१३ साली यासंदर्भांतील चर्चा थांबविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघ ‘एफटीए’वर भारताने सुरु केलेल्या चर्चेचे महत्व वाढते.

भारतात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याकरिता सरकार परकीय गुंतवणुकीचे नियम आणखी शिथिल करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही गोयल यांनी दिली. खाण, बँकिंग भांडवली बाजारात गुंतवणुकीच्या संधी वाढविण्यासाठी अलीकडेच सुधारणा करण्यात आल्या. यानंतर ‘एफडीआय’ नियमात शिथिलता आणण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे गोयल म्हणाले.

दरम्यान, भारत हा ब्रिटनमध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक करणारा अमेरिकेनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. यासंदर्भांतील एक वृत्त जाहीर झाले असून भारताने ब्रिटनमधील १०६ प्रकल्पांमध्ये २०१९-२० या सालात गुंतवणूक केली आहे. यावरून भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध मजबूत झाल्याचे स्पष्ट होते.

leave a reply