सौदी अरेबियाच्या लष्कराचे प्रमुख भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली – सौदी अरेबियाच्या लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फहद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल-मुतैर भारताच्या भेटीवर आले आहेत. सौदीच्या लष्करप्रमुखांनी भारताला दिलेली ही पहिलीच भेट ठरते. २०२० साली भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे सौदीच्या दौर्‍यावर गेले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य प्रस्थापित झाल्याचे माध्यमांचे म्हणणे होते. सौदीच्या लष्करप्रमुखांचा हा भारत दौरा उभय देशांमधील संरक्षणविषयक तसेच लष्करी सहकार्य अधिकच व्यापक करणारा ठरेल, असे भारताच्या लष्कराने म्हटले आहे.

सौदी अरेबियाच्या लष्कराचे प्रमुख भारताच्या भेटीवरसौदी अरेबिया सध्या येमेनमधील युद्धाच्या आघाडीवर गुंतलेला आहे. त्याचवेळी आखाती क्षेत्रातील अस्थैर्याचा सौदी अरेबियाच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. त्यातच सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वावर अमेरिकेचे बायडेन प्रशासन नाराज असून सौदीचे शस्त्रसहाय्य रोखण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने घेतला आहे. येमेनच्या बंडखोरांबरोबर घनघोर संघर्ष सुरू असताना, बायडेन प्रशासनाचे हे असहकार्य सौदीसाठी घातक ठरू शकते. त्याचवेळी अमेरिका इराणबरोबर अणुकरार करून इस्रायल व सौदी तसेच युएई या आखाती देशांची सुरक्षा अधिकच धोक्यात टाकत असल्याच्या बातम्या येत आहेत.

अशा परिस्थितीत सौदी, युएई व आखातातील इतर देशांनीही भारताबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य दृढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या सहकार्याची पायाभरणी २०२० सालच्या लष्करप्रमुख नरवणे यांच्या सौदी भेटीने करण्यात आली. यानंतरच्या काळात उभय देशांचे संरक्षणविषयक सहकार्य दृढ झाले होते. गेल्या वर्षी भारत व सौदीच्या नौदलामध्ये अल मोहेद-अल हिंदी नावाचा संयुक्त युद्धसराव सौदीच्या सागरी क्षेत्रात पार पडला होता. तसेच गोपनीय माहितीचे आदानप्रदान, दहशतवादविरोधी कारवाया, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि सायबर सुरक्षेसंदर्भात सहकार्य करण्याचे भारत व सौदीने जाहीर केले होते.

लेफ्टनंट जनरल फहद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल-मुतैर यांच्या या भारतभेटीत हे सहकार्य अधिकच वेग घेईल, असे संकेत मिळत आहेत. सौदी अरेबिया भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जातात. ब्रह्मोस तसेच आकाश हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करून सौदी अरेबिया अमेरिकेच्या पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणेला पर्याय उभा करण्याची तयारी करीत आहे. अमेरिकेने सौदीमध्ये तैनात असलेल्या पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणेच्या काही बॅटरीज् काढून घेतल्या होत्या. येमेनी बंडखोर सौदीच्या राजधानीपर्यंत क्षेपणास्त्रे व रॉकेट्सचा मारा करीत असताना, सौदीला विश्‍वासार्ह हवाई सुरक्षा यंत्रणेची आवश्यकता आहे.

अशा परिस्थितीत भारताबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य प्रस्थापित करून सौदी ब्रह्मोस तसेच आकाश क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकतो. तसे झाले तर भारताच्या शस्त्रविषयक निर्यातीला फार मोठी चालना मिळेल. हे सहकार्य पुढच्या काळात अधिक व्यापक बनू शकेल. कारण सौदी अरेबिया शस्त्रास्त्रांची सर्वाधिक खरेदी करणारा देश म्हणून पुढे येत आहे. अशा परिस्थितीत भारताचे सौदीबरोबरील संरक्षणविषयक सहकार्याला फार मोठे धोरणात्मक महत्त्व आले आहे. भारताला इंधनाचा सर्वाधिक पुरवठा सौदीकडूनच केला जातो. तसेच भारतात सुमारे १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा सौदीने याआधी केली होती. तर लाखो भारतीय कामगार सौदी अरेबियात काम करीत आहेत.
अशा परिस्थितीत सौदी अरेबियाबरोबरील भारताचे संरक्षणविषयक सहकार्य व्यापक होत आहे, ही आखाती क्षेत्रातील भारताचा प्रभाव अधिकच वाढविणारी बाब ठरेल.

याबरोबरच क्वाडचा वापर रशियाच्या विरोधात करण्याची बायडेन प्रशासनाची इच्छा जीन-पेरी यांनी बोलून दाखविली, ही लक्षणीय बाब ठरते. भारताचा रशियाच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न बायडेन प्रशासनाने याआधीही केला होता. रशियाबरोबरील एस-४००चा करार भारताने मोडीत काढावा, अन्यथा अमेरिका निर्बंध लादेल, अशी धमकी बायडेन प्रशासनाने दिली होती. मात्र त्याची पर्वा न करता भारताने रशियाबरोबरील हा करार पूर्ण केला होता.

leave a reply