भारत मोबाईल उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचला

नवी दिल्ली – गेल्या आर्थिक वर्षात ३3 कोटी मोबाईलचे उत्पादन करत भारत मोबाईल उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाच वर्षात देशात २०० पेक्षा अधिक मोबाईल निर्मिती युनिट्स सुरु झाल्याचे माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.भारत मोबाईल उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर

भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा मोबाइल फोन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये देशातील मोबाईल उत्पादन युनिटची संख्या २०० ने वाढली आहे. रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती देणारं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन सोशल मीडियाद्वारे शेअर केले. २०१९-२० या आर्थिक वर्षात ३३ कोटी मोबाईलची निर्मिती करण्यात आली. तुलनेत २०१४ मध्ये दोन प्रकल्पांमध्ये ६ कोटी मोबाईलचे उत्पादन करण्यात येत होते, अशी माहिती रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. तसेच २ जून रोजी दुपारी १२ वाजता या क्षेत्रासाठी ‘थिंक इलेक्ट्रॉनिक्स थिंक इंडिया’ या नव्या योजनेची घोषणा करण्यात येणार असल्याचे केंद्रीयमंत्री प्रसाद यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी देशात उत्पादनास सुरुवात केली असून येत्या काळात अँपल सारख्या काही आंतराष्ट्रीय कंपन्या देशात मोबाईल उत्पादन करण्यास उत्सुक आहेत. शाओमी कंपनी भारतात आपले ९९ टक्के स्मार्टफोचे उत्पादन करत असून ६५ टक्के पार्ट्स देखील भारतातच तयार केले जात असल्याचे स्मार्टफोन कंपनी शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन म्हणाले. भारत जगातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र बनू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

leave a reply