‘वंदे भारत मिशन’ मुळे २० लाखांहून अधिक भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली – कोरोनामुळे जगातील विविध देशांमध्ये अडकलेल्या सुमारे २० लाखांहून अधिक भारतीयांना ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत मायदेशी आणण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या सातव्या टप्प्यात २४ देशांमधून १,०५७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे हाताळण्यात येत आहेत याद्वारे सुमारे १.९५ लाख भारतीय मायदेशी परततील असा अंदाज आहे. दरम्यान शुक्रवारी या मिशनअंतर्गत दिल्लीहून एअर इंडियाचे विमान चीनच्या वुहानला रवाना झाले आहे.

वंदे भारत मिशन' मुळे २० लाखांहून अधिक भारतीय मायदेशी परतले

वंदे भारत मिशन’ मुळे २० लाखांहून अधिक भारतीय मायदेशी परतलेगुरुवारपर्यंत ‘वंदे भारत मिशन’च्या अंतर्गत हवाई मार्गाबरोबर सागरी वाहतूक तसेच इतर मार्गांनी २०.५५ लाख भारतीय मायदेशी परतले आहेत. १ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या सातव्या टप्प्यात सुमारे १.९५ लाख भारतीय मायदेशी परततील असा अंदाज आहे. आता आम्ही पुढील टप्प्याची तयारी करीत आहोत, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. एअर इंडियातर्फे वंदे भारत मिशन अंतर्गत २७ ऑक्टोबरपर्यंत ७,७१९ उड्डाणे करण्यात आली. त्याद्वारे ९.९९ लाख प्रवासी मायदेशी परतले आहेत.

वंदे भारत मिशन' मुळे २० लाखांहून अधिक भारतीय मायदेशी परतले

दरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडियाचे विमान दिल्ली विमानतळावरून चीनच्या वुहानला निघाल्याची माहिती देण्यात आली. याआधी २३ ऑक्टोबर रोजी ही विमान सेवा स्थगित करण्यात आली होती. पण बुधवारी ही सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती बीजिंगमधील भारतीय दूतावासाने दिली आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत चीनमध्ये जाणारे एअर इंडियाचे हे सहावे विमान आहे.

leave a reply