अहमदनगरमध्ये स्वदेशी हॉवित्झरच्या चाचण्या सुरू

अहमदनगर – 50 किलोमीटर दूरपर्यंत मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या हॉवित्झर ‘अँडव्हान्स टोव्हेड आर्टिलरी गन सिस्टीम’च्या (एटीएजीएस) चाचण्या सुरू झाल्या आहेत. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) ही तोफ विकसित केली असून महाराष्ट्राच्या अहमदनगरमध्ये चाचण्या घेतल्या जात आहेत. याचा व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाला आहे.

भारतात लष्कराच्या ताफ्यात सुमारे अडीच दशके नव्या तोफा खरेदी करण्यात आल्या नव्हत्या. मात्र गेल्या काही वर्षात अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांकडून भारताने हॉवित्झर तोफांची खरेदी सुरू केली होती. मात्र त्याचबरोबर भारतीय बनवाटीच्या तोफा विकसित करण्यासाठीच्या प्रकल्पाला वेग देण्यात आला होता. यानुसार ‘डीआरडीओ’ने ‘एटीएजीएस’ ही तोफ विकसित केली आहे. 155एएम/52 कॅलिबरच्या तोफा लवकरच भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात भर टाकतील.

2016 पासून या तोफांच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या. 2017 सालात घेण्यात आलेल्या दोन चाचण्यांमध्ये सुमारे 48 कीलोमीटरपर्यत दूरपर्यंत मारा करून या तोफांनी विक्रम प्रस्थापित केला होता. याच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर लष्कराने 40 तोफांची ऑर्डरही दिली. मात्र याच्या युजर ट्रायल दरम्यान सप्टेंबर महिन्यात बॅरल फुटल्याने अपघात घडला. यामुळे एक तांत्रिक दोष समोर आला होता. हा दोष दूर करून आता अंतिम चाचण्या सुरू झाल्या आहेत. भारत फोर्ज लष्करासाठी या तोफांची निर्मिती करणार आहे.

leave a reply