भारत-अमेरिकेत एअर लॉन्च युएव्ही विकसित करण्यासाठी करार

नवी दिल्ली – भारत-अमेरिकेतील ‘डिफेन्स टेक्नॉलॉजी ऍण्ड ट्रेड इनिशिटिव्ह’ (डीटीटीआय) गटाची ११ बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये संरक्षण तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्यात येणारे अडथळे दूर करण्याचा व सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय झाला. एअर लॉन्च युएव्हीच्या संयुक्त विकासासाठी दोन्ही देशांमध्ये करार झल्याची माहिती संरक्षणमंत्रालयाने दिली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारत-अमेरिकेत एअर लॉन्च युएव्ही विकसित करण्यासाठी करारसंरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार (डीटीटीआय) बैठकीत दोन्ही देशांमधील विविध संरक्षण प्रकल्पावर प्रकल्पांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे डीटीटीआयची सलग दुसरी बैठक व्हर्च्युअल संपन्न झाली. संरक्षण सचिव सचिव (संरक्षण उत्पादन) राज कुमार याच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिष्टमंडळ आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अंडर सेक्रेटरी ग्रेगरी कौस्नर यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेचे शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी झाले होते.

लष्कर, नौदल, हवाई आणि विमानवाहू तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारे चार संयुक्त कार्यकारी गट डीटीटीआयअंतर्गत स्थापन करण्यात आले आहेत. सध्या या चारही क्षेत्रात दोनी देशांमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमाचा अहवाल या गाटांकडून ठेवण्यात आला. तसेच येत्या काही काळात हे प्रकल्प कशापदद्धतीने पुर्ण केले जातील यावर चर्चा करण्यात आली.

सप्टेंबर २०२० सालात झालेल्या बैठकीत हवाई प्राणालीसंदर्भातील कार्यक्रारी गटामध्ये एअर लॉन्च म्हणजे विमानातूनच सोडता येणार्‍या युएव्हीसाठी सहकार्याला अंतिम रुप देण्यात आले होते. तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या करारावर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. हा युएव्हीच्या विकासासाठी दोन्ही देशांमध्ये संपन्न होणारा पहिला करार आहे. यावर दोन्ही देशांमध्ये हवाई तंत्रज्ञानाविषयीचे सहकार्य अधिक बळकट होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. यावेळी संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढावे यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

द्विपक्षीय संरक्षण व्यापार वाढविणे, संरक्षण साहित्याचा संयुक्त विकास व सहनिर्मिती करणे हा डीटीटीआयचा उद्देश आहे. दर सहा महिन्याने याची बैठक संपन्न होते. यावेळी डीटीटीआयअंतर्गत अमेरिकी आणि भारतीय उद्योगांना विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता, संरक्षण उद्योग सहयोग मंचाचे एक व्हर्च्युअल प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

leave a reply