कलवरी श्रेणीतील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ नौदलात सहभागी

मुंबई – भारतीय नौदलाच्या पाणबुडीद्वारे आखल्या जाणार्‍या मोहिमां राबविण्याचे सामर्थ्य ‘आयएनएस वेला’कडे आहे, अशा शब्दात नौदलप्रमुख ऍडमिरल करमबिर सिंग यांनी या पाणबुडीचे महत्त्व अधोरेखित केले. गुरुवारी मुंबईच्या माझगाव डॉक येथे ‘आयएनएस वेला’च्या नौदलातील सहभागाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना नौदलप्रमुखांनी ‘वेलाचे सामर्थ्य व मारकक्षमता देशाच्या सागरी हितसंबंधांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल’, असा विश्‍वास नौदलप्रमुखांनी यावेळी व्यक्त केला.

कलवरी श्रेणीतील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ नौदलात सहभागीनौदलात अधिकृतरित्या सहभागी होण्याच्या आधीच या पाणबुडीची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. कलवरी क्लासमध्ये येणारी व प्रोजेक्ट ७५च्या अंतर्गत तयार होणारी ही भारताची चौथी पाणबुडी आहे. फ्रान्सच्या सहकार्याने तयार झालेली ही देशात तयार झालेली ही डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी सुमारे ५० दिवस पाण्याखाली राहू शकते. अत्यंत कमी आवाज करणार्‍या या पाणबुडीचा वेध सोनार रडारयंत्रणेला घेता येत नाही. या स्टेल्थ अर्थात रडारयंत्रणेला गुंगारा देण्याच्या क्षमतेमुळे ही पाणबुडी ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाते.कलवरी श्रेणीतील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ नौदलात सहभागी

या पाणबुडीमध्ये प्रगत सोनार रडारयंत्रणा असून अद्ययावत शस्त्रास्त्रे व तैनात करण्यात आली आहेत. एकदा का लक्ष्य निश्‍चित झाले की ही पाणबुडी आपल्या क्षेपणास्त्र किंवा टॉर्पिडोद्वारे त्याचा वेध घेऊ शकते. ‘आयएनएस वेला’कडे असलेली ही क्षमता शत्रूच्या पाणबुड्या व युद्धनौकांसाठी अतिशय घातक ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो. यामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचे दावे केले जातात.

leave a reply