भारतीय बँका व चलनचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व वाढवायला हवे

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

नवी दिल्ली – भारताच्या बँका आणि चलन आंतरराष्ट्रीय व्यापार व पुरवठा साखळीतील महत्त्वाचा घटक बनविण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. तसेच वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी आर्थिक व व्यापारी स्तरावर उत्तमरित्या व्यवहार करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. वित्त आणि कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी हा संदेश दिला.

International-tradeस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून ‘आयकॉनिक विक सेलिब्रेशन्स’चे आयोजन करण्यात आले आहे. देशाने वित्तक्षेत्रात वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उभारलेले आहेत. त्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे ठरते. केवळ देशातच नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर ही माहिती पोहोचविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. कारण भारत केवळ मोठी बाजारपेठ असलेला देश नाही. तर सारे जग भारताकडे आता मोठ्या आशेने व विश्वासाने पाहू लागले आहे, याची जाणीव पंतप्रधानांनी यावेळी करून दिली. गेमचेंजर, प्रतिभाशाली, संशोधनाची मोठी क्षमता असलेला देश, म्हणून जग भारताकड पाहू लागले आहे. गेल्या आठ वर्षातील संघटीत प्रयत्नांचे हे यश ठरते, असा दावा पंतप्रधानांनी केला. धोरणांच्या सरकारकेंद्री अंमलबजावणीपासून भारताने फारकत घेतली असून आता लोककेेंद्री कारभाराला आता देशात महत्त्व दिले जात आहे. यानुसार जनतेपर्यंत कल्याणकारी योजनांची महिती अधिक प्रभावीपणे पोहोचविली जाते. ‘जन समर्थ पोर्टल’चे लाँचिंग करीत असताना पंतप्रधानांनी यामुळे कल्याणकारी सरकारी योजना विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच मिळेल. यामुळे त्यांना आपली स्वप्ने साकार करता येतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

देशाच्या उद्योगक्षेत्राशी निगडीत असलेले सुमारे 1500 कायदे तसेच 30 हजार नियमावली आणि गुन्हेगारीच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आलेल्या काही तरतुदी दूर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे देशातील कंपनी केवळ प्रगती करणार नाहीत, तर नवी उंची गाठतील, असा दावा पंतप्रधानांनी व्यक्त केले. जीएसटीद्वारे करांचे सुसूत्रिकरण करून सरकारने करविषयक प्रणाली अधिक सोपी केली. याचे परिणाम आता समोर येऊ लागला आहेत. आता देशात प्रत्येक महिन्याला एक लाख कोटी रुपयांहून अधिक प्रमाणात महसूल जीएसटीद्वारे गोळा होत आहे. ही आता सर्वसामान्य बाब बनली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले. तसेच ईपीएफओसाठी रजिस्ट्रेशनच्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे सांगून यावरही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

सोमवारी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक, दोन, पाच, दहा आणि 20 रुपयांच्या विशेष नाणी लाँच केली. ही नाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला समर्पित करण्यात येत असली तरी त्याचा दैनंदिन जीवनातही वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ही नवी नाणी जनतेला अमृतकाळाच्या उद्दिष्टांची आठवण करुन देईल. तसेच देशाच्या विकासासाठी सर्वसामान्यांना प्रेरित करील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

leave a reply