इराणमुळे पाच लाख सिरियन जनतेचा बळी

- इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीची टीका

तेहरान – ‘सिरियातील बाशर अल-अस्साद यांची राजवट वाचविण्यासाठी इराणने या देशात केलेल्या लष्करी हस्तक्षेपामुळे पाच लाख सिरियन्सचा बळी गेला. या युद्धात रासायनिक शस्त्रास्त्रे किंवा इतर शस्त्रे वापरण्यात आली. हे अतिशय चुकीचे आहे’, अशी जळजळीत टीका इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अकबर रफ्संजानी यांची कन्या फझेह रफ्संजानी यांनी केली.

माजी राष्ट्राध्यक्ष रफ्संजानी यांनी सिरिया मोहिम छेडण्याचा इराणच्या निर्णयाला जोरदार विरोध केला होता. तसेच कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी यांना सिरियात रवाना करू नका, असे आवाहनही रफ्संजानी यांनी केले होते. पण त्यांचे कुणीही ऐकले नाही. आज त्यांचेच शब्द खरे ठरले, असा हल्ला फझेह यांनी इराणी संकेतस्थळाशी बोलताना चढविला. सिरिया मोहिम छेडून इराणने आपले मित्र व सहकारी देश गमावले आहेत, याची जाणीव फझेह यांनी करून दिली.

leave a reply