लेबेनॉन आणि इराकमधील हिंसाचार, अस्थैर्याला इराण जबाबदार

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा ठपका

जेरूसलेम – ‘इराण ज्या कुठल्या देशात प्रवेश करते, ते देश हिंसाचार, गरिबी, अस्थैर्य आणि अपयशाच्या वावटळीत सापडतात. अशाच प्रकारे इराणने लेबेनॉन व इराकच्या राजकीय व्यवस्थांना वेठीस धरले आहे. पण लवकरच लेबेनॉन व इराक इराणच्या पकडीतून स्वत:ला मुक्त करतील’, असा दावा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये लेबेनॉन व इराकमध्ये झालेल्या घडामोडींचा दाखला देऊन इस्रायलच्या पंतप्रधानांनी सदर विधाने केली आहेत.

लेबेनॉन आणि इराकमधील हिंसाचार, अस्थैर्याला इराण जबाबदार - इस्रायलच्या पंतप्रधानांचा ठपकागेल्या आठवड्यात लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने केलेल्या निदर्शनांवर गोळीबार झाला होता. यानंतर काही काळ बैरूतच्या रस्त्यांवर संघर्ष सुरू होता. या घटनेनंतर लेबेनॉनमधील हिजबुल्लाहविरोधात जनक्षोभ वाढल्याचा दावा केला जातो.

लेबेनॉन आणि इराकमधील हिंसाचार, अस्थैर्याला इराण जबाबदार - इस्रायलच्या पंतप्रधानांचा ठपकातर गेल्याच आठवड्यात इराकमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत इराणसंलग्न गटाचा पराभव झाला. या निवडणुकीत विजयी ठरलेल्या मुक्तदा अल-सद्र या नेत्याने गेल्या काही वर्षांपासून इराणविरोधी भूमिका स्वीकारली होती. त्यामुळे या निवडणुकीतील मुक्तदा अल-सद्र यांचा विजय इराणसाठी हादरा असल्याचे बोलले जाते.

लेबेनॉन आणि इराकमधील हिंसाचार, अस्थैर्याला इराण जबाबदार - इस्रायलच्या पंतप्रधानांचा ठपकाइस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी रविवारच्या आपल्या कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना इराणला लक्ष्य केले. आत्तापर्यंत इराणसंलग्न गटांनी लेबेनॉन व इराकला वेठीस धरल्याचा आरोप पंतप्रधान बेनेट यांनी केला. पण गेल्या आठवड्यात या दोन्ही देशांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता, लेबेनॉन व इराकमधील जनता इराणच्या गुदमरवून टाकणार्‍या पकडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचा दावा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला आहे.

leave a reply