इराणने लिबियातील गद्दाफी राजवटीला रासायनिक शस्त्रास्त्रे पुरविली होती

- अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

गद्दाफीवॉशिंग्टन – ‘लिबियन हुकूमशहा मुअम्मर अल-गद्दाफी यांना इराणने रासायनिक शस्त्रास्त्रे पुरविली होती. इराकबरोबरील युद्धातही इराणने रासायनिक शस्त्रे वापरली होती. या रासायनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती इराणनेच केली होती. पण आंतरराष्ट्रीय संघटनांपासून याची माहिती दडवून ठेवली’, असे घणाघाती आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी इराणवर रासायनिक शस्त्रास्त्र कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. इराणकडे रासायनिक शस्त्रास्त्रे निर्मितीचे कारखाने होते पण इराणने याची माहिती आंतरराष्ट्रीय संघटनेपासून दडवून ठेवली. त्याचबरोबर १९७८-८७ दरम्यान लिबिया आणि चाड या आफ्रिकी देशांमध्ये पेटलेल्या युद्धात इराणने लिबियातील गद्दाफी यांच्या राजवटीला रासायनिक शस्त्रास्त्रे पुरविली होती. याची माहितीही इराणने आंतरराष्ट्रीय समुदायापासून लपवून ठेवली, असे पॉम्पिओ म्हणाले.गद्दाफी

२०११ साली गद्दाफी यांची राजवट कोसळल्यानंतर लिबियात तात्पुरत्या स्वरुपात प्रस्थापित केलेल्या सरकारने ‘सल्फर मस्टर्ड’चे ५१७ तोफगोळे आणि बॉम्ब हस्तगत केले होते. लिबियन सरकारने ही माहिती ‘ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल्स वेपन्स’ (ओपीसीडब्ल्यू) या संघटनेला कळविली होती. गद्दाफीया रासायनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती इराणमध्ये झाल्याचे पुढच्या चौकशीतून उघड झाल्याचे पॉम्पिओ म्हणाले. इराकबरोबरच्या युद्धातही इराणने बसरा शहरात रासायनिक शस्त्रांचा वापर केला होता, असे पॉम्पिओ म्हणाले.

अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांच्या आरोपांवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने टीका केली. तर रशियाने इराणवरील आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, येत्या काही तासात इराण आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेतील सहकार्याबाबतही माहिती उघड करणार असल्याचे पॉम्पिओ यांनी जाहीर केले आहे

leave a reply