इस्रायलशी सहकार्य करणार्‍या बाहरिनला इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशारा

तेहरान – इस्रायलच्या ‘मिलिटरी अटॅचे’ अर्थात लष्करी अधिकार्‍याला आपल्या देशात परवानगी देणाच्या बाहरिनच्या निर्णयावर इराणने संताप व्यक्त केला. इराणच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या या तैनातीसाठी बाहरिनला इरबिलसारखे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. गेल्या महिन्यात इराकच्या इरबिल शहरात इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे जाळे असल्याचा आरोप करून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इथे क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. तसेच हल्ले बाहरिनवरही होतील, असे इराण बजावत आहे.

इस्रायलशी सहकार्य करणार्‍या बाहरिनला इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशाराबाहरिनमध्ये अमेरिकन नौदलाची फिफ्थ फ्लिट तैनात आहे. पर्शियन आखात तसेच आखाती मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने ही तैनाती केली आहे. बाहरिनमधील अमेरिकन नौदलाच्या कार्यालयातून फिफ्थ फ्लिटचे संचलन केले जाते. महिन्याभरापूर्वी अमेरिकेने आपल्या या नौदल कार्यालयात इस्रायलचा मिलिटरी अटॅचे अर्थात लष्करी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. इस्रायल आणि बाहरिन यांच्यातील चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली होती.

इस्रायलशी सहकार्य करणार्‍या बाहरिनला इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशारादीड वर्षांपूर्वी इस्रायल आणि बाहरिन यांच्यात झालेल्या अब्राहम करारांतर्गत लष्करी सहकार्य प्रस्थापित झाले होते. बाहरिनमधील इस्रायली मिलिटरी अटॅचेच्या या नियुक्क्तीवर इराणने त्यावेळी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण गेल्या आठवड्यात इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांना पत्रकारांनी बाहरिनमधील या नियुक्तीबाबत प्रश्‍न केला. त्यावर खातिबझादेह यांनी बाहरिनला धमकावले.

‘इरबिल- या एका शब्दात इराणच्या प्रत्युत्तराबाबत सांगता येईल’, असे खातिबझादेह यांनी बजावले. इरबिल ही इराकच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी आहे. गेल्या महिन्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स पथकाने कुर्दिस्तानच्या इरबिल शहरावर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. या हल्ल्यात इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या एजंट्सचे सेफ हाऊस अर्थात छुपा तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा इराणने केला होता. तसेच आखाती-अरब देशांमध्ये इस्रायली एजंट्सच्या हालचाली खपवून घेणार नसल्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्सने बजावले होते. इस्रायलशी सहकार्य करणार्‍या बाहरिनला इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशाराइराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खाबितझादेह यांनी इरबिलचा उल्लेख करून बाहरिनला हल्ल्यांची धमकी दिली. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संलग्न असलेल्या ‘जावान’ या दैनिकातूनही बाहरिनला असाच इशारा देण्यात आला होता.

आखातात इराणविरोधात जे काही घडेल, त्यासाठी इस्रायलला जबाबदार धरून तिथल्या तिथे कारवाई केली जाईल, असे या इराणी दैनिकाने धमकावले. इस्रायलचे निवृत्त लष्करी अधिकारी आणि विश्‍लेषक लेफ्टनंट कर्नल मिशेल सिगल यांनी इराणच्या या धमक्यांची माहिती उघड केली. तसेच बाहरिनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी इराण येमेनमधील हौथी बंडखोर किंवा इराकमधील संलग्न दहशतवादी संघटनांचा वापर करू शकतो, अशी शक्यता सिगल यांनी वर्तविली आहे.

इस्रायलबरोबर सामरिक सहकार्य प्रस्थापित करणार्‍या आखाती देशांना याची फार मोठी किंमत चुकती करावी लागेल, अशा धमक्या इराणने याआधीही दिल्या होत्या.

leave a reply