पाकिस्तानच्या पेशावरमधील घातपातामागे आयएसआय

प्रमुख नेत्यांसह पेशावर पोलिसांचा गंभीर आरोप

attack in Pakistan's Peshawarइस्लामाबाद – पाकिस्तानच्या पेशावरमधील पोलीस मुख्यालयाच्या आवारातील प्रार्थनास्थळात शंभराहून अधिकजणांचे बळी घेणाऱ्या आत्मघाती हल्ल्यमागे भारत असल्याचे आरोप पाकिस्तानात झाले होते. तर काहीजणांनी यासाठी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला जबाबदार धरले होते. पण आता हा घातपात दुसऱ्या कुणी नाही, तर पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयनेच घडविल्याचे आरोप होत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांनी आयएसआयचे माजी प्रमुख फैज हमीद या आत्मघाती हल्ल्यामागे असल्याचा आरोप केला. तर पेशावर पोलिसांनी या हल्ल्याविरोधात रस्त्यावर उतरून यामागे आयएसआयचे कारस्थान असल्याचे दावे केले आहेत.

Maryam Nawazमरियम नवाझ व पेशावर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या या आरोपांमध्ये आयएसआय आता आपल्याच देशात घातपात घडविण्याच्या कामात गुंतल्याचे उघड होत आहे. सोमवारी पेशावरमध्ये झालेल्या या हल्ल्यातील बळींची संख्या 101 वर गेली असून याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. भारत तसेच अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला या हल्ल्यांसाठी जबाबदार धरणाऱ्या पाकिस्तानातील माध्यमे व माजी राजनैतिक अधिकाऱ्यांना तालिबानने चांगलीच चपराक लगावली. अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही, असे तालिबानने नियुक्त केलेल्या परराष्ट्रमंत्री अमीर खान मोत्ताकी याने म्हटले आहे.

ISI behind attackअफगाणिस्तान हा दहशतवादाचे केंद्र असलेला देश नाही. तसे असते तर अफगाणिस्तानच्या इतर शेजारी देशांमध्येही घातपात झाले असते. पण तसे न होता केवळ पाकिस्तानातच दहशतवादी हल्ले होत आहेत, यावर पाकिस्तानने विचार करावा आणि या हल्ल्याचा नीट तपास करावा, असा टोला मोत्ताकी याने लगावला. आत्मघाती हल्ल्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हानी होत नाही, त्यामागे काहीतरी वेगळेच असावे, असे सूचक उद्गार मोत्ताकी याने काढले आहेत. पेशावरच्या पोलीस दलाची या हल्ल्यावर जहाल प्रतिक्रिया उमटली असून या हल्ल्याच्या संदर्भात इतरांना ठाऊक नसलेल्या गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत, अशा घोषणा पेशावर पोलिसांनी रस्त्यावर उतरून दिल्या. तसेच समुदायिक राजीनामे देऊन आपण हे कारस्थान उघड करणार असल्याचे पेशावर पोलिसांनी बजावले आहे.

पाकिस्तानचा विरोधी पक्ष सरकारकडे निवडणुकीची मागणी करीत आहे. ही निवडणूक टाळण्यासाठी हा घातपात घडविण्यात आल्याचा इशारा पेशावर पोलीस देत आहेत. तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या व सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्या असलेल्या मरियम नवाझ यांनी आयएसआयचे माजी प्रमुख फैज हमीद हे पेशावरमधील घातपातमागे असल्याचा आरोप केला. फैज हमीत आयएसआयचे प्रमुख असताना त्यांनी इम्रान खान यांना बेकायदेशीररित्या सर्वतोपरी सहाय्य पुरविले होते. तसेच फैज हमीद पेशावरमधील कॉर्प्स कमांडर म्हणून कार्यरत होते, त्या प्रभावाचा वापर करून त्यांनी हा घातपात घडवून आणल्याचा दावा मरियम नवाझ यांनी केला आहे.

leave a reply