इराणविरोधात युद्ध भडकविण्यासाठी इस्रायलच अमेरिकी सैनिकांवर हल्ले चढविल

- इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ

इराणविरोधाततेहरान/जेरूसलेम – ‘इस्रायलचे एजंट्स इराकमधील अमेरिकी जवानांवर हल्ले चढविण्याच्या प्रयत्नात आहेत. हा हल्ला घडवून इस्रायल त्याचे खापर इराणवर फोडील व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरोधात युद्ध छेडण्यासाठी निमित्त मिळवून देईल. इराणविरोधातराष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या सापळ्यापासून सावध रहावे. कारण इराणवरील हल्ले अमेरिकेच्या मित्रदेशांसाठीच घातक ठरतील’, अशी धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी दिली. तर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलवर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इराणचे परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिका व इस्रायलवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. इराणविरोधातअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपला कार्यकाळ संपण्याआधी इराणवर हल्ले चढवतील, यासाठी अमेरिका घातपात घडवून आणेल, असे आरोप झरिफ यांनी केले होते. पण यावेळी झरिफ यांनी थेट इस्रायल अशा घातपाताच्या तयारीत असल्याचा आरोप केला. इस्रायलचे ऊर्जामंत्री युवल स्टेनित्झ यांनी इराणचे आरोप फेटाळले आहेत. मात्र, झरिफ यांनी या आरोपांच्या अखेरीस दिलेल्या इशार्‍याकडे इस्रायल अधिक गांभीर्याने पाहत असल्याचे स्टेनित्झ यांनी म्हटले आहे.

leave a reply