इस्रायल-मोरोक्को विमानसेवा सुरू

तेल अविव – इस्रायल आणि मोरोक्कोमधील पहिली विमानसेवा मंगळवारपासून सुरू झाली. त्याचबरोबर इस्रायल, मोरोक्को आणि अमेरिका यांच्यात सहकार्य करारही पार पडले. गेल्या अडीच महिन्यांमध्ये इस्रायलसोबत सहकार्य प्रस्थापित करणारा मोरोक्को या चौथा अरब देश ठरला होता.

विमानसेवा

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि मोरोक्को यांच्यातील ऐतिहासिक सहकार्याची घोषणा केली. या घोषणेबरोबरच इस्रायल-मोरोक्कोमध्ये थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा झाली होती. मंगळवारी ‘तेल अविव’ ते ‘रबात’ अशी विमानसेवा सुरू झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार जॅरेड कश्‍नर यांच्या उपस्थितीत मोरोक्कोची राजधानी रबातसाठी प्रवासी विमान रवाना झाले. या व्यतिरिक्त अमेरिका, इस्रायल आणि मोरोक्कोमध्ये द्विपक्षीय व त्रिपक्षीय करारावरही स्वाक्षर्‍या झाल्या. तर येत्या काळात इस्रायलमध्ये उच्चायुक्तालय सुरू करण्यात येतील, असेही मोरोक्कोने स्पष्ट केले.

leave a reply