हिंसाचार रोखण्यासाठी इस्रायल व पॅलेस्टाईनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा

- हिंसक घटनांमुळे इजिप्तच्या मध्यस्थीने सुरू झालेली चर्चा धोक्यात

शर्म अल-शेख – इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हिंसाचार रोखण्यासाठी इजिप्तमध्ये चर्चा सुरू झाली आहे. इस्रायल व पॅलेस्टाईनच्या प्रतिनिधींसह इजिप्त, जॉर्डन आणि युएईचे अधिकारी देखील ‘शर्म अल-शेख’ शहरात सुरू असलेल्या या चर्चेत सहभागी झाले आहेत. मात्र या चर्चेच्या बातम्या येत असतानाच, रविवारी सकाळी सिरियामध्ये ‘इस्लामी जिहाद’चा कमांडर असलेल्या ‘अली रम्झी अल-असवाद’ याला इस्रायलने ठार केल्याचे वृत्त धडकले. पॅलेस्टिनींच्या अधिकारांशी लढत असल्याचा दावा करणाऱ्या अल-असवाद याला इस्रायलच्या गुप्तचरांनी ठार केल्याचे बोलले जाते. त्याचवेळी पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमधील हुवारा शहरात दोन इस्रायली नागरिकांवर दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या आल्या आहेत.

हिंसाचार रोखण्यासाठी इस्रायल व पॅलेस्टाईनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा - हिंसक घटनांमुळे इजिप्तच्या मध्यस्थीने सुरू झालेली चर्चा धोक्यातगेल्या काही दिवसांपासून इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये हिंसाचाराचे नवे सत्र सुरू झाले. इस्रायलने वेस्ट बँकमध्ये ज्यूधर्मियांसाठी नव्या वस्त्या वसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर इथली परिस्थिती अधिकच चिघळली होती. यानंतर वेस्ट बँकमधूनही इस्रायलवर हल्ले होऊ लागले. आत्तापर्यंत गाझापट्टी व वेस्ट बँक या पॅलेस्टाईनच्या दोन भूभागांपैकी वेस्ट बँकवर तुलनेने उदारमतवादी नेत्यांचा प्रभाव होता. पण अलीकडच्या काळात कट्टर इस्रायलविरोधी संघटनांनी देखील वेस्ट बँकवर प्रभाव वाढविण्यात यश मिळविले असून त्यांच्यामुळे इस्रायलवर वेस्ट बँकमधून होणारे हल्ले वाढल्याचा दावा केला जातो.

इस्रायली नागरिकांवरील हल्ल्यांच्या प्रमाणात चिंताजनकरित्या वाढ होत असताना, इस्रायलने गाझा व वेस्ट बँकमधील हल्लेखोरांविरोधात आक्रमक कारवाई हाती घेतली. यामुळे अधिकच रक्तपात होईल, असे इशारे पाश्चिमात्य देशांनी दिले होते. अमेरिकेच्या इस्रायलमधील राजदूतांनी उघडपणे हिंसाचार वाढेल, असे बजावले होते. याला इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांची आक्रमक धोरणे जबाबदार असल्याचे संकेत अमेरिका तसेच प्रमुख युरोपियन देश देत आहेत. अशा परिस्थितीत हिंसाचार रोखण्यासाठी इजिप्त तसेच जॉर्डन या देशांनी प्रयत्न सुरू केले असून इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये वाटाघाटींसाठी मध्यस्थी केल्याचे दिसते.

हिंसाचार रोखण्यासाठी इस्रायल व पॅलेस्टाईनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा - हिंसक घटनांमुळे इजिप्तच्या मध्यस्थीने सुरू झालेली चर्चा धोक्यातयानुसार रविवारी इजिप्तच्या शर्म अल-शेख या शहरामध्ये इस्रायल व पॅलेस्टाईनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू झाली. जॉर्डन व अमेरिकेचेही अधिकारी या चर्चेला उपस्थित होते. याचे अधिक तपशील उघड होऊ शकलेले नाहीत. मात्र या चर्चेच्या दरम्यान ‘अली रम्झी अल-असवाद’ या इस्लामिक जिहाद संघटनेच्या कमांडरला इस्रायली गुप्तचरांनी ठार केले. इस्लामिक जिहाद संघटनेच्या ‘अल कुद्स ब्रिगेड’नेच ही माहिती दिली. भ्याड शत्रूने गोळ्या झाडून अल-असवाद याला ठार केल्याचा दावा या संघटनेने केला.

याबरोबरच वेस्ट बँकमधील हुवारा शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इस्रायलचे दोन नागरिक जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. यातील एकाची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती दिली जाते. या हल्ल्याचा तपास सुरू असल्याची माहिती इस्रायली यंत्रणांनी दिली. इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये चर्चा सुरू असतानाच, या बातम्या येत असून त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेले हे प्रयत्न धोक्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

हिंदी

 

leave a reply