इस्लामिक जिहादच्या रॉकेटस्‌‍च्या माऱ्याला इस्रायलचे हवाई हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर

तेल अविव – शनिवारी देखील इस्लामिक जिहादने इस्रायलच्या सीमाभागजवळील अशदोद आणि ॲश्खेलॉन या शहरांवर रॉकेट्सचा मारा केला. गेल्या पाच दिवसात इस्लामिक जिहादने इस्रायलच्या दिशेने हजारो रॉकेट्स व मॉर्टर्स डागल्याचे समोर आले आहे. शनिवारी याला प्रत्युत्तर देणाऱ्या इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील तीन जण ठार झाले. आत्तापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात ३४ पॅलेस्टिनी ठार झाले असून यात सहा मुलांचा समावेश आहे. तर या हल्ल्यातील जखमींची संख्या १४७ वर असल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

इस्लामिक जिहादच्या रॉकेटस्‌‍च्या माऱ्याला इस्रायलचे हवाई हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तरगेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला इस्लामिक जिहाद व इस्रायलमधील संघर्ष अधिकाधिक उग्ररूप धारण करीत असताना, जगभरातून हा संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले जात आहे. अमेरिकेने देखील संघर्षबंदीसाठी आवाहन केले असून इजिप्तने यासाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी इस्रायलने या शांतीचर्चेतून माघार घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण इस्लामिक जिहादबरोबर इजिप्तच्या मध्यस्थीने वाटाघाटी सुरू असल्याची माहिती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी दिली. पण चर्चा सुरू असली तरी शांतता प्रस्तापित करण्यासाठी इस्लामिक जिहादच्या शर्ती मानण्यास इस्रायल तयार नसल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शांततेला शांततेद्वारेच प्रत्युत्तर मिळेल, असे सूचक विधान या इस्रायली अधिकाऱ्यांनी केले.

वेगळ्या शब्दात इस्लामिक जिहादचे इस्रायलवरील हल्ले थांबल्याखेरीज, गाझावरील इस्रायलचे हवाई हल्ले थांबरणार नाहीत, असा इशारा हे अधिकारी देत आहेत. इस्लामिक जिहादच्या रॉकेटस्‌‍च्या माऱ्याला इस्रायलचे हवाई हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तरगाझातील आपल्या कमांडर्सवरील इस्रायलचे हल्ले थांबविण्यात यावेत, अशी इस्लामिक जिहादची प्रमुख मागणी असल्याचे दावे केले जातात. या शर्ती मानणे शक्य नसल्याचे इस्रायलकडून सांगण्यात येत आहे. गाझापट्टीत हमासनंतरची पॅलेस्टिनींची दुसऱ्या क्रमांकाची प्रबळ संघटना अशी इस्लामिक जिहादची ओळख आहे. मागच्या काही महिन्यांपासून या संघटनेने इस्रायलविरोधात अतिशय जहाल भूमिका स्वीकारली होती. त्यानंतर इस्रायलने इस्लामिक जिहादच्या नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांचे सत्र सुरू केले होते.

इस्लामिक जिहादने शनिवारीही इस्रायलच्या सीमेवरील शहरांना रॉकेट हल्ल्यांचे लक्ष केल्यानंतर, इस्रायलने या संघटनेच्या गाझातील कमांड सेंटरवर हवाई हल्ले चढविले. पुढच्या काळातही इस्रायल दहशतवाद्यांना टिपणारे हवाई हल्ले करीत राहिल, असे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. या हल्ल्यांमध्ये ठार झालेल्यांमध्ये ९० टक्के दहशतवादीच होते, असा दावा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला होता.

हिंदी

 

leave a reply