कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर

बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले आहे. २२४ विधानसभा मतदारसंघ असलेल्या कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभा निवडणूक पार पडली होती. यात काँग्रेस पक्षाला १३६ तर भारतीय जनता पक्षाला ६५ जागा मिळाल्याचे वृत्त आहे. तर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाला १९ जागांवर विजय मिळाला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीरकर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीरशनिवारच्या सकाळपासूनच वृत्तवाहिन्यांवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल येऊ लागले. काही तासांमध्ये या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस हा या निवडणुकीत सर्वाधिक १३६ जागा मिळविणारा पक्ष बनल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. तर भारतीय जनता पक्षाला ६५ जागा मिळाल्या आहेत.

याबरोबरच पंजाबच्या जालंधरमध्ये पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचे सुशील रिंकू विजयी झाले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये १७ पालिकांच्या निवडणूक निकालांचीही घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेशातील या सर्वच १७ पालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेऊन सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत.

 

leave a reply