इस्रायल आणि युएईमध्ये अंतराळक्षेत्रात लष्करी सहकार्य प्रस्थापित होईल

- इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा दावा

दुबई – इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा धोका वाढत असताना, इस्रायल आणि युएईमधील लष्करी सहकार्य देखील आकार घेऊ लागल्याचे दिसत आहे. इस्रायल आणि युएईमध्ये ‘मिलिटरी स्पेस’ सहकार्य प्रस्थापित करण्याची पूर्ण क्षमता असल्याचा दावा इस्रायलच्या एरोस्पेस उद्योगाशी संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने केला. गेल्या महिन्यातच इस्रायल आणि युएईमध्ये अंतराळक्षेत्रासंबंधी सहकार्य करार झाला होता.

इस्रायल आणि युएईमध्ये अंतराळक्षेत्रात लष्करी सहकार्य प्रस्थापित होईल - इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा दावायुएईच्या दुबईमध्ये ‘इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉटिकल कॉंग्रेस’चे आयोजन केले आहे. यामध्ये ‘इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रिज्-आयएआय’ या इस्रायलच्या आघाडीच्या कंपनीने सहभाग घेतला आहे. या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या आयएआयचे वरिष्ठ अधिकारी श्‍लोमी सुद्री यांनी इस्रायल व युएईमध्ये अंतराळक्षेत्रात लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्याची क्षमता असल्याचे सांगितले. येत्या काळात युएईबरोबर असे सहकार्य होऊ शकते, असा दावा सुद्री यांनी केला.

‘इस्रायल आणि युएईमध्ये बरेच काही साम्य आहे. दोन्ही छोटे देश असून त्यांच्या शेजारी देशात सुरू असलेल्या घडामोडीवर दोन्ही देशांचे हितसंबंध अवलंबून आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये अंतराळात लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्याची क्षमता आहे’, असे सुद्री म्हणाले. इस्रायल आणि युएईमध्ये अंतराळक्षेत्रात लष्करी सहकार्य प्रस्थापित होईल - इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा दावाइराणपासून असलेल्या धोक्याचा विचार करता येत्या काळात इस्रायल व युएईमध्ये अंतराळात लष्करी सहकार्य प्रस्थापित होईल, असा विश्‍वास सुद्री यांनी इस्रायली वर्तमानपत्राशी बोलताना व्यक्त केला.

गेल्या महिन्यात २० ऑक्टोबर रोजी इस्रायल आणि युएईमध्ये अंतराळ सहकार्याबाबत महत्त्वाचा करार पार पडला होता. पण हा करार पूर्णपणे नागरी संशोधनावर अवलंबून होता. गेल्या वर्षी पार पडलेल्या अब्राहम करारानंतर इस्रायल आणि युएईतील सहकार्य टप्प्याटप्प्याने वाढत असून त्यावर संताप व्यक्त केला होता. इस्रायलशी अब्राहम करार करणार्‍या देशांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणने धमकावले होते.

leave a reply