जम्मू-काश्मीरच्या अवंतीपुरा भागात ‘जैश’चे मॉड्यूल नष्ट – चौघांना अटक

श्रीनगर – जम्मू- काश्मीरच्या अवंतीपुरा भागात ‘जैश ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे मॉड्यूल नष्ट करण्यात जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना यश आले असून चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अवंतीपुरा चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या दहशतवाद्यांना या चौघांनी साहाय्य केले होते. त्यांना रसद, शस्त्रे आणि दारूगोळा पुरविण्याची कामे या चौघांनी केली होती अशी माहिती त्यांच्या चौकशीतून पुढे आली आहे.

शबीर अहमद पर्रे, शीराझ अहमद डार, शाफत अहमद मीर आणि इशफाक अहमद शाह अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघेही ख्रू भागातल्या बाथन परिसराचे रहिवासी आहेत. हे चौघेही ख्रूचा भाग व त्रालचे जंगल क्षेत्रात ‘जैश’च्या दहशतवाद्यांना आश्रय आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी शस्त्रास्त्रे व दारूगोळा पुरविण्याचे काम हे चौघे करीत होते.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी या चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त केला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांच्या चौकशीत उघड होणाऱ्या माहितीमुळे अवंतीपुरा भागात जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांचे जाळे उद्वस्थ करण्यात यश मिळेल, असे जम्मू -काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

leave a reply