जम्मू-काश्मीरमध्ये ‘जैश’च्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

श्रीनगर – ड्रोनद्वारे शस्त्र दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवून मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा ‘जैश -ए- मोहम्मद’चा कट सुरक्षादलांनी उधळला. गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्ररेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमाभागात पाकिस्तानातून ड्रोन्सने शस्त्रास्त्रे ड्रॉप करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे सुरक्षादलासमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगून जम्मू- काश्मीरच्या पोलिसांनी सुरक्षा यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दहशतवादी हल्लासोमवारी रात्री अखनूर सेक्टरमध्ये लष्करच्या जवानांना ड्रोन्सचा आवाज आला. तातडीने जवानांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ड्रोन्सने शस्त्रास्त्रे उतरविली होती. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी हा साठा जप्त केला. यात दोन ‘एके-४७ असॉल्ट रायफल्स’, तीन ‘मँगक्झिन्स’, ९० ‘लाईव्ह एके राऊंडस्’ आणि एका पिस्तूलाचा समावेश होता. ड्रोनमधली शस्त्रास्त्रे घेण्यासाठी दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांना पकडता आले नाही. पण या प्रकरणी चौकशी केल्यावर ‘जैश’ने आखलेल्या कटाचा खुलासा झाला.दहशतवादी हल्ला

सीमेपलीकडून ‘जैश’ने हे शस्त्रात्रे पाठविल्याचे समोर आले आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत पाकिस्तानने पाच वेळा सीमेपलीकडे ड्रोन्स धाडले. पण प्रत्येक वेळी सुरक्षा दलाने ड्रोन ताब्यात घेऊन शस्त्रास्त्रे जप्त केली. गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी ड्रोनने शस्त्रात्रे ड्रॉप केली होती. त्यावेळी ही शस्त्रात्रे नेण्यासाठी ‘लश्कर-ए-तोयबा’चे तीन दहशतवादी पुलवामामधून आले होते. पण त्याआधीच सुरक्षा दलांनी या तीन दहशतवाद्यांना पकडले. त्यांना पाठविण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यांमध्ये चिनी बनावटीचे शस्त्रे होते. तसेच एक लाख रुपये रोकड होती.

leave a reply