चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर जपानकडून सलग नवव्या वर्षी संरक्षणखर्चात वाढ

संरक्षणखर्चात वाढटोकिओ – कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून आक्रमक वर्चस्ववादी कारवाया सुरू असून त्याला टक्कर देण्यासाठी जपानने जोरदार तयारी सुरू केली आहे. सोमवारी जपानने संरक्षणक्षेत्रासाठी सुमारे ५२ अब्ज डॉलर्सची तरतूद करीत असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत जपानने आपल्या संरक्षणखर्चात १.१ टक्का वाढ केली आहे. जपानकडून संरक्षणखर्चात वाढ करण्याची ही सलग नववी वेळ आहे. स्वदेशी बनावटीचे ‘स्टेल्थ फायटर जेट’, लांब पल्ल्याची विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रे व ‘कॉम्पॅक्ट वॉरशिप्स’च्या निर्मितीवर जपान भर देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चीनने गेल्या काही महिन्यात साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. संपूर्ण साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीवर ताबा मिळवण्याची वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा यामागे आहे. संरक्षणखर्चात वाढजपाननजिक ईस्ट चायना सीमध्ये चीनच्या विनाशिका, पाणबुड्या व गस्तीनौका जपानच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मे महिन्यात चीनने आपली ‘लिओनिंग’ ही विमानवाहू युद्धनौका व ‘स्ट्राईक ग्रुप’ जपाननजिकच्या ईस्ट चायना सी क्षेत्रात तैनात केली होती. चीनच्या लढाऊ विमानांकडून जपानच्या हवाईहद्दीत घुसखोरीचे प्रयत्न होत असल्याचे दावेही समोर आले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, जपानने माजी पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्या नेतृत्त्वाखाली संरक्षणधोरणात मोठे बदल करण्यास सुरुवात केली होती. संरक्षणखर्चात सातत्याने करण्यात येणारी वाढ त्याचाच एक भाग आहे. अ‍ॅबे यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या योशिहिदे शुगा यांनीही हेच धोरण पुढे कायम राखण्याचे संकेत दिले आहेत. संरक्षणखर्चात वाढसोमवारी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ सालासाठी जपानने आपल्या संरक्षणक्षेत्रासाठी ५१.७ अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच जपानने सागरी हद्दीजवळ धोकादायकरित्या वावरणार्‍या विनाशिकांना लक्ष्य करण्यासाठी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करीत असल्याची घोषणा केली होती. संरक्षणखर्चात वाढत्यापूर्वीही गेल्या काही महिन्यात जपानने आपल्या संरक्षणदलांची क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यात स्वदेशी बनावटीच्या ‘स्टेल्थ फायटर जेट’चा समावेश असून त्यासाठी अमेरिकेच्या ‘लॉकहिड मार्टिन’ या कंपनीचे सहाय्य घेण्यात येत आहे.

सप्टेंबर महिन्यात जपान सरकारने आपल्या संरक्षणदलाला यापुढे शत्रूच्या भूभागावरही हल्ले करण्याची परवानगी असल्याचे जाहीर केले होते. त्यापूर्वी हायपरसोनिक क्षेपणास्त्र यंत्रणा व विमानवाहू युद्धनौका विकसित करण्याचे संकेतही जपानकडून देण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात जपानच्या सत्ताधारी पक्षाने ‘इंटिग्रेटेड एअर अँड मिसाईल डिफेन्स’ क्षमता असणारा तळ विकसित करावा, असा प्रस्तावही मंजूर केला होता.

याव्यतिरिक्त जपानने अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणार्‍या संरक्षणसामुग्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. त्यात ‘एफ-३५’ ही लढाऊ विमाने, अतिप्रगत ‘एजिस’ रडार यंत्रणा, पॅट्रिऑट क्षेपणास्त्रे, ‘बिजीएम-१०९ टॉमाहॉक क्रूझ मिसाईल्स’ व ड्रोन्सचा समावेश आहे.v

leave a reply