बांगलादेशात सरकारविरोधात प्रचंड निदर्शने

ढाका – बांगलादेशात इंधनाचे दर एका दिवसात 50 टक्क्यांने वाढविण्यात आले. यानंतर आधीच महागाईमध्ये होरपळत असलेल्या बांगलादेशी जनतेच्या असंतोषाचा कडेलोट झाला असून सरकारविरोधात प्रचंड निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले. तसेच काही ठिकाणी प्रेोलपंपाच्या भोवती निदर्शकांनी वेढा देऊन ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. श्रीलंकेची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्यावर काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत प्रचंड मोठा जनप्रक्षोभ उफाळून आला होता. बांगलादेशही त्याच वाटेवर असल्याचे दावे काही विश्लेषक करीत आहेत.

bangladesh-protestबांगलादेशच्या सरकारने शनिवारी पेोल व डिझेलच्या दरात मोठ्या दरवाढीची घोषणा केली होती. पेोल-डिझेलचे दर तब्बल 52 टक्क्यांने वाढविण्यात आले होते. बांगलादेशच्या निर्मितीपासून एकाचवेळी झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी इंधन दरवाढ ठरली आहे. यामुळे एकारात्रीत पेोलचे दर 89 टकावरून 135 टकावर, तर डिझेल व केरोसिनच्या दरातही 45 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात बांगलादेशच्या परकीय गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. तसेच कर्जाचा बोजा वाढला आहे. यावर्षाच्या सुरूवातील 45 अब्ज डॉलर्स इतकी असलेली परकीय गंगाजळी कमी होऊन 38 अब्ज डॉलर्स इतकी खाली आली आहे. परकीय गंगाजळीमध्ये घट होत असल्याने बांगलादेशने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे धाव घेतली होती व 4.5 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने पेोलच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेन युद्धामुळे भडकलेले इंधन दर, तसेच खाद्य तेल व अन्नधान्याच्या दराने बांलादेशचा आयातीवर खर्च वाढला असून प्रचंड वेगाने परकीय गंगजळी संपत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेण्यापूर्वी इंधन दरावरील सवलत मागे घेण्याची अट असल्याच्या बातम्या आहेत. यामुळे ही दर वाढ करण्यात आली. मात्र या अभूतपूर्व दरवाढीने बांगलादेशात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. आधीच बांगलादेशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामध्ये या दरवाढीमुळे महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता वर्तविली जाते.

पाकिस्तान व श्रीलंकेत परकीय गंगाजळीने तळ गाठल्याने प्रचंड मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. श्रीलंकेत तर मोठ्या निदर्शनांनतर राष्ट्रध्यक्षांना व पंतप्रधानांना आपली सत्ता सोडून पळ काढवा लागला होता व नवीन सरकार सत्तेत आले होते. भारताच्या मदतीच्या आधारावर श्रीलंका पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता बांगलादेशच्या रुपात भारताच्या आणखी एका शेजारी देशाची अवस्था अशीच होण्याजी भीती व्यक्त केली जाते.

दरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी बांगलादेशच्या भेटीवर असून यावेळी दोन्ही देशांमध्ये चार महत्त्वाचे करार झाले. यामध्ये सागरी संशोधन व आपत्कालीत परिस्थितीत मदतीसाठी झालेला करार हा भारताच्या दृष्टीने संकटाचा ठरू शकतो. या करारांद्वारे चीन बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवरील आपला प्रभाव वाढविण्याची भीती वर्तविली जात आहेत.

leave a reply