पंजाबमध्ये ‘मिग-२९’ कोसळले

वैमानिक सुरक्षित

नवी दिल्ली – पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये भारतीय वायुसेनेचे ‘मिग २९’ विमान कोसळले. सुदैवाने दुर्घटनेपुर्वी दोन्ही वैमानिक विमानाच्या बाहेर पडल्याने यशस्वी ठरल्याने विमानिकांचे प्राण बचावले.

शुक्रवारी सकाळी मिग-२९ विमानाने वायू सेनेच्या जालंधरमधील तळावरून नियमित सरावासाठी उड्डाण घेतले, मात्र काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ही दुर्घटना होशियारपूर जिल्हातील रुडकी गावात घडली. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. दुर्घटनेवेळी विमानात दोन वैमानिक होते. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर उडी घेतली. हे विमान मोकळ्या जागेत कोसळल्याने जीवितहानी झाली नाही.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत असून त्यानंतरच दुर्घटनेचे कारण समजू शकेल असे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. भारतीय वायूसेनेत ६५ पेक्षा जास्त मिग-२९ विमाने आहेत. या विमानांचे नुकतेच अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. अत्याधुनिक सिस्टिम आणि शस्त्रास्त्रांनी ही विमाने सुसज्ज आहेत. फेब्रुवारी महिन्यात देखील भारतीय नौदलाचे मिग-२९के विमान गोव्याच्या किनाऱ्यावर अरबी समुद्रात कोसळले होते.

leave a reply