फिलिपाईन्सच्या एक इंच भूमीचाही ताबा घेऊ देणार नाही

- फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस

ताबा घेऊ देणार नाहीमनिला – ‘गेल्या काही वर्षांमध्ये फिलिपाईन्सने भूराजकीय तणाव वाढविणाऱ्या काही घटना पाहिल्या आहेत. पण याचा अर्थ फिलिपाईन्सची शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याला धक्का द्यायचा प्रयत्न झाला तर आम्ही शांत बसू, असा होत नाही. फिलिपाईन्स इतर कुठल्याही देशाला आपल्या हद्दीच्या एक इंच भूभागाचाही ताबा घेऊ देणार नाही’, असा इशारा फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांनी दिला. साऊथ चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या गस्तीनौकांनी केलेल्या अरेरावीला फिलिपाईन्सने हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच चीनच्या गस्तीनौकांनी फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून फिलिपिनो गस्तीनौकांवरच लेझर रोखले होते. लष्करी श्रेणीतील या लेझरमुळे काही क्षणासाठी आमच्या जवानांची दृष्टी बाधित झाली होती, असा आरोप फिलिपाईन्सने केला होता. चीनच्या या कारवाईचा फोटोग्राफही फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केला होता. यानंतर फिलिपाईन्सने राजधानी मनिलामधील चीनच्या राजदूतांना समन्स बजावले. तसेच फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीतील चीनच्या या कारवाईचा जाब विचारला होता.

त्यानंतर शनिवारी फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट चीनचा उल्लेख न करता इशारा दिल्याचे दिसत आहे. फिलिपाईन्सचे सार्वभौमत्त्व व आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करून या सागरी क्षेत्रातील गस्त सुरू ठेवणार असल्याचे मार्कोस यांनी बजावले.

leave a reply