पेंटॅगॉनचे वरिष्ठ अधिकारी तैवानच्या दौऱ्यावर जाणार

तैवानच्या दौऱ्यावरतैपेई – अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे उपमंत्री मायकल चेस लवकरच तैवानला भेट देणार आहेत. चीनकडून तैवानच्या विरोधातील वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, चेस तैवानला भेट देणार असल्याचा दावा केला जातो. कोरोनाच्या साथीनंतर तैवानला भेट देणारे चेस हे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.

पेेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या या भेटीबाबत आपल्याला विशेष माहिती नसल्याचे तैवानचे संरक्षणमंत्री चिऊ कुओ-शेंग यांनी म्हटले आहे. पण अमेरिका तैवानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असल्यामुळे चेस यांच्या भेटीत दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यावर चर्चा होईल, असे संकेत कुओ-शेंग यांनी दिले.

दरम्यान, व्हाईट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी देखील लवकरच तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

leave a reply