अण्वस्त्रांचा वापर केल्यास उत्तर कोरियातील राजवटीचा शेवट होईल

- दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाचा इशारा

अण्वस्त्रांचा वापरसेऊल – अण्वस्त्रांच्या साठ्यात घातक प्रमाणात वाढ करण्याची घोषणा करणाऱ्या उत्तर कोरियाला दक्षिण कोरियाने सज्जड इशारा दिला. कुठल्याही कारणावरुन उत्तर कोरियन लष्कराने अण्वस्त्रांचा वापर केलाच तर ती देशातील किम जाँग-उन यांच्या राजवटीची अखेर ठरेल, अशा कडक शब्दात दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने बजावले आहे. तसेच उत्तर कोरिया अणुयुद्धाच्या धमक्या देत असताना, खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी अमेरिकेबरोबर आण्विक शस्त्रास्त्रांसह युद्धसराव आयोजित करण्याबाबत चर्चा केली.

गेल्या वर्षी उत्तर कोरियाने 90 हून अधिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. यामध्ये मध्यम पल्ल्ल्याच्या तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश होता. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर कोरियाने लघु पल्ल्याच्या तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रातील तणाव कायम ठेवला. त्याचबरोबर अमेरिका व दक्षिण कोरिया संयुक्त युद्धसरावाचे आयोजन करून आपल्याला धमकावत असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला व अणुहल्ल्याच्या धमक्याही दिल्या.

अण्वस्त्रांचा वापरयामध्ये नवे आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करणे आणि अण्वस्त्रांच्या साठ्यात भर टाकणे, यांचा समावेश होता. दोन महिन्यांपूर्वीच उत्तर कोरियाने आपल्या आण्विक धोरणात बदल करून ‘फर्स्ट स्ट्राईक’चा अवलंब करण्याचे जाहीर केले होते. याद्वारे उत्तर कोरिया आपल्या शेजारी देशांबरोबर अमेरिकेवर अणुहल्ल्याची धमकी देत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला होता. यावर खवळलेल्या दक्षिण कोरियाने रविवारी किम जाँग-उन यांच्या राजवटीलाच धमकावले.

उत्तर कोरियाने आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केलाच तर किम जाँग-उन यांची राजवट संपुष्टात येईल, असे दक्षिण कोरियाने संरक्षण मंत्रालयाने ठणकावले. त्याचबरोबर उत्तर कोरियाने त्वरीत आपल्या आण्विक हालचाली रोखून वाटाघाटी सुरू कराव्या, असे आवाहन दक्षिण कोरियाने केले आहे. तर सोमवारी स्थानिक वर्तमानपत्राने दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांची मुलाखत प्रसिद्ध केली. यामध्ये दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाच्या आण्विक धमकीविरोधात तयारी करण्याचे संकेत दिले. यामध्ये अमेरिकेच्या ‘न्यूक्लिअर ॲसेट’चा सहभाग असलेल्या संयुक्त युद्धसरावाचा समावेश असू शकतो, अशी घोषणा दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केली. असे असले तरी दक्षिण कोरिया आपल्या देशात अमेरिकेची अण्वस्त्रे तैनात करणार नाही, असा खुलासा राष्ट्राध्यक्ष येओल यांनी केला आहे.

leave a reply