सुदानच्या अधिकृत सरकारला रशियन वॅग्नरचे सहकार्य घेण्याचा अधिकार आहे

- रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

संयुक्त राष्ट्र/वॉशिंग्टन/खार्तूम – सुदानमधील गृहयुद्धात अडकलेल्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन हा संघर्ष थांबविण्यासाठी तोडगा काढावा. तिसऱ्या देशाला सुदानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याची परवानगी देऊ नये. कारण तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सुदानच्या भल्याचा नसेल. काही वर्षांपूर्वी अमेरिकेने असाच हस्तक्षेप करुन सुदानचे दोन तुकडे केले होते, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी बजावले आहे. त्याचवेळी अमेरिकेने सुदानच्या संघर्षापासून दूर रहावे, असा इशारा रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. याबरोबरच रशियाच्या वॅग्नर ग्रूपचे सहकार्य सुदानच्या अधिकृत सरकारला हवे असेल, तर त्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या सरकारला नक्कीच आहे, असे सूचक विधान रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे.

सुदानच्या अधिकृत सरकारला रशियन वॅग्नरचे सहकार्य घेण्याचा अधिकार आहे - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्हगेल्या १३ दिवसांपासून सुदानमध्ये भडकलेल्या गृहयुद्धासाठी रशिया जबाबदार असल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांकडून सुरू झाला आहे. रशियाचे वॅग्नर ग्रूप ही कंत्राटी जवानांची कंपनी सुदानमधील संघर्षात एका गटाला सहाय्य करीत असल्याचा ठपका पाश्चिमात्य देशांनी ठेवला आहे. रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा वापर करुन आपल्या देशावरील हे आरोप फेटाळले. रशियावर आरोप करणाऱ्या अमेरिकेनेच सुदानवर अन्याय केल्याची आठवण परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी करुन दिली.

‘अमेरिकेनेच अखंड सुदानचे उत्तर आणि दक्षिण असे दोन तुकडे केले होते. यानंतर अमेरिकेकडून दोन्ही देशांना एकत्र ठेवण्यासाठी, अर्थव्यवस्था उभारण्यासाठी आणि सुदानी जनतेला सहाय्य पुरविण्याची अपेक्षा होती. पण अमेरिकेने या देशाच्या नेत्यांवरच निर्बंधांची कारवाई केली’, असा पलटवार रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. सुदानच्या अधिकृत सरकारला रशियन वॅग्नरचे सहकार्य घेण्याचा अधिकार आहे - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्हत्याचबरोबर सुदानच्या नेत्यांनी अमेरिकेच्या या हस्तक्षेपापासून सावध रहावे आणि देशांतर्गत संघर्ष रोखण्यासाठी अमेरिका किंवा इतर कुठल्याही देशाचे सहाय्य घेऊ नये, असे लॅव्हरोव्ह यांनी सुचविले.

तर वॅग्नर ग्रूपबाबत होणाऱ्या आरोपांचाही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी समाचार घेतला. सुदानच्या अधिकृत सरकारला रशियाच्या वॅग्नरचे सहाय्य हवे असेल, तर तशी मागणी करण्याचा अधिकार सुदानकडे नक्कीच आहे, अशी घोषणा लॅव्हरोव्ह यांनी केली. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, माली आणि आफ्रिकेतील इतर काही देशांनी अशाप्रकारे वॅग्नरचे सहाय्य घेतले आहे, याकडेही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. पण वॅग्नरची सुदानमधील तैनाती या देशातील संघर्ष भडकविण्यास सुदानच्या अधिकृत सरकारला रशियन वॅग्नरचे सहकार्य घेण्याचा अधिकार आहे - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्हकारणीभूत ठरू शकते, असा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत.

सुदानचे हुकूमशहा ओमर बशिर यांनी वॅग्नर ग्रूपचे सहाय्य घेतले होते. सुदानच्या लष्कराने बशिर यांची सत्ता उलथल्यानंतर लष्करप्रमुख जनरल बुरहान यांनी देखील वॅग्नर गटाशी संपर्क ठेवला होता. तर गेल्या काही वर्षांपासून सुदानमधील निमलष्करीदलाचे प्रमुख जनरल दागालो देखील वॅग्नर गटाच्या संपर्कात होते. निमलष्करीदलाच्या सहकार्याने वॅग्नरने सुदानमधील सोन्याच्या खाणींची लूट केल्याचा आरोप अमेरिकन व युरोपिय विश्लेषक तसेच माध्यमे करीत आहेत. २०२१ साली तब्बल ३२.७ टन इतक्या वजनाचे आणि १.९ अब्ज डॉलर्स किंमतीचे सोने रशियाने सुदानमधून बाहेर काढल्याचा दावा हे विश्लेषक करीत आहेत. वॅग्नर तसेच सुदानमधील निमलष्करीदलाने आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. पण काही महिन्यांपूर्वी सुदानच्या लष्कराने रशियाला नौदलतळ उभारण्यासाठी दिलेली परवानगी अमेरिकेला पसंत पडली नसल्याची चर्चाही माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे अमेरिकेने सुदानमध्ये संघर्ष भडकविल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

leave a reply