अमेरिका दक्षिण कोरियामध्ये अण्वस्त्रसज्ज पाणबुडी, बॉम्बर्स तैनात करणार

- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची अमेरिकेवर टीका

वॉशिंग्टन – अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये बुधवारी ‘वॉशिंग्टन डिक्लरेशन’ करार संपन्न झाला. यानुसार अमेरिका दक्षिण कोरियामध्ये अण्वस्त्रसज्ज पाणबुडी आणि बॉम्बर्स विमानांची आलटून पालटून तैनाती करणार आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाने अमेरिका किंवा सहकारी देशांविरोधात अण्वस्त्रांचा वापर केलाच तर या देशातील हुकूमशाही राजवटीचा शेवट केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. पण आपल्या शेजारी देशाला धमकावणारी अमेरिका या क्षेत्रात तणाव वाढवित असल्याचा आरोप चीनने केला.

अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाकडून कर्जमर्यादा वाढविणाऱ्या विधेयकाला मंजुरी - बायडेन प्रशासनाला खर्चकपातीचे निर्देश देणाऱ्या तरतुदींचा समावेशदक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर महत्त्वाचा करार केला. उत्तर कोरियाच्या आण्विक तसेच क्षेपणास्त्रांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा करार पार पडल्याची माहिती अमेरिकन माध्यमांनी दिली. सदर कराराद्वारे अमेरिकेने दक्षिण कोरियाला आश्वस्त केल्याचा दावा केला जातो. येत्या काळात अमेरिकेची अण्वस्त्रसज्ज पाणबुडी आणि बॉम्बर्स विमाने दक्षिण कोरियात तैनात असतील.

अमेरिकेची ही तैनाती कायमस्वरुपी नसेल तर आलटून पालटून असेल, असे बायडेन यांनी म्हटले आहे. पण त्या मोबदल्यात दक्षिण कोरियाने अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू नये, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष येओल यांच्याकडून घेतले आहे. येत्या काळात उत्तर कोरियाने हल्ला चढविलाच तर अमेरिका आपल्या मदतीला धावून येणार नाही, अशी माहिती दक्षिण कोरियातील सर्वेक्षण अहवालातून समोर आली होती. अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाकडून कर्जमर्यादा वाढविणाऱ्या विधेयकाला मंजुरी - बायडेन प्रशासनाला खर्चकपातीचे निर्देश देणाऱ्या तरतुदींचा समावेशराष्ट्राध्यक्ष येओल यांनी देखील अण्वस्त्रनिर्मितीचे संकेत दिले होते.

अशा परिस्थितीत, दक्षिण कोरियाला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यात बायडेन प्रशासन यशस्वी झाल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर उत्तर कोरियातील हुकूमशाहीचा अंत करण्याचा इशारा देऊन बायडेन प्रशासनाने दक्षिण कोरियाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मात्र अमेरिकेने उत्तर कोरियाला दिलेल्या धमकीमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. अमेरिका जाणुनबुजून उत्तर कोरियाला भडकावून या क्षेत्रात तणाव वाढवित असल्याचा ठपका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला. तसेच अमेरिकेने उत्तर कोरियाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नये, असेही चीनने बजावले.

leave a reply