वझिरीस्तानमधील हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी ठार

पाकिस्तानी लष्कराचा अधिकारीइस्लामाबाद – सोमवारी रात्री वझिरिस्तानच्या वायव्य प्रांतातील शाकाई भागात पाकिस्तानी लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी ठार झाला. या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर वझिरीस्तानच्या स्पल्गा, मीरानशाह भागात झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे दोन जवान ठार झाले होते. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

पाकिस्तानी लष्कराचा अधिकारीपाकिस्तानच्या वझिरीस्तानात दहशतवादी हल्ले वाढले असून इथली जनतादेखील या दहशतवादी हल्ल्यांची बळी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण वझिरीस्तानातल्या पश्तू नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले होते. या भागात तालिबानी दहशतवाद्यांच्या कारवाया पुन्हा वाढल्या आहेत आणि पुन्हा हा पश्तू बहुल भाग युद्धभूमी बनत असल्याचे आरोप या आदोलकांनी केले होते.

रविवारी रात्री शाकाई भागात गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीवर हल्ला झाला. या हल्ल्यात कॅप्टन अब्दुल्ला जफर ठार झाले. कॅप्टन अब्दुल्ला हे या तुकडीचे नेतृत्व करीत होते. हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने क्लियरन्स ऑपरेशनसाठी या परिसराला वेढा दिला, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे.

leave a reply