जागतिक महासत्तांमध्ये मोठा संघर्ष भडकण्याची शक्यता वाढली आहे

- अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांचा इशारा

संघर्ष भडकण्याची शक्यतावॉशिंग्टन – ‘चीन आणि रशिया, या अमेरिकेसमोरील दोन जागतिक महाशक्ती आहेत. या दोन्ही देशांकडे लक्षणीय लष्करी सामर्थ्य असून सध्याची नियमावर आधारीत जागतिक व्यवस्था बदलण्याची क्षमता या देशांमध्ये आहे. जागतिक महाशक्तींमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता वाढलेली असताना अस्थिर बनलेल्या जगात अमेरिका प्रवेश करीत आहे’, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी दिला. तर अण्वस्त्रांच्या आघाडीवर चीन करीत असलेली प्रगती जागतिक सुरक्षेचा तोल ढासळविणारी ठरेल, असे अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक कमांडने बजावले आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ७७३ अब्ज डॉलर्सचा विक्रमी संरक्षणखर्च जाहीर केला. अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतरही अमेरिकेच्या संरक्षणखर्चात या वृद्धीबाबत अमेरिकन संघर्ष भडकण्याची शक्यतासिनेटच्या ‘आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटी’ने संरक्षणमंत्री लाईड ऑस्टिन आणि संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांना जाब विचारला. यावर बोलताना संरक्षणदलप्रमुख जनरल मिले यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा दाखला दिला.

रशियाचे युक्रेनवरील हल्ले फक्त युरोपच नाही तर जागतिक शांती व सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका ठरतात. दुसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, गेल्या ७८ वर्षानंतर नियमावर आधारीत प्रस्थापित झालेल्या जागतिक व्यवस्थेला रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याने जोरदार हादरा बसला आहे’, असे सांगून जनरल मिले यांनी रशियावर टीका करून अमेरिकेच्या वाढलेल्या संरक्षणखर्चाचे समर्थन केले.

संघर्ष भडकण्याची शक्यतातसेच जग सर्वात मोठ्या अस्थैर्याकडे झुकत चालल्याचा इशारा संरक्षणदलप्रमुख जनरल मिले यांनी दिला. चीन व रशिया या जागतिक महासत्तांकडून जागतिक व्यवस्थेला असलेल्या धोक्याचा उल्लेख जनरल मिले यांनी केला. त्याचबरोबर रशिया आणि चीनच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांना अमेरिकेकडे उत्तर नसल्याची कबुली संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि जनरल मिले यांनी दिली.

अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक कमांडचे प्रमुख ऍडमिरल चार्ल्स रिचर्ड यांनीही चीनच्या वाढत्या आण्विक क्षमतेचा धोका अधोरेखित केला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात चीनने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वाहून नेणार्‍या हायपरसोनिक ग्लायडरची चाचणी घेतली. आपल्या या ग्लायडररने १०० मिनिटांमध्ये ४० हजार किलोमीटरचा प्रवास केल्याचा दावा चीनने केला होता. चीनच्या या क्षमतेकडे लक्ष वेधून ऍडमिरल रिचर्ड यांनी तुलनेत अमेरिकेच्या धोरणात्मक क्षमता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.

leave a reply