पाकिस्तानातील सरकारसमर्थकांची न्यायालयाविरोधात निदर्शने

इस्लामाबाद – इम्रान खान यांना झुकते माप दिल्याचा आरोप करून पाकिस्तानच्या प्रमुख राजकीय पक्षांनी याविरोधात निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीबाहेर निदर्शकांनी आक्रमक प्रदर्शन करून इथे तोडफोड केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना बडतर्फ करण्याचा हालचालीही सुरू झाल्या असून यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर पाकिस्तानच्या संसदेत काहीजणांनी इम्रान खान यांनी सर्वांसमक्ष फाशी देण्याची मागणी केली.

पाकिस्तानातील सरकारसमर्थकांची न्यायालयाविरोधात निदर्शनेन्यायाचा खून करण्यासाठी इम्रान खान यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सहाय्य केले, अशी टीका सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाच्या नेत्या मरिअम नवाझ यांनी केली आहे. इम्रान खान यांना सर्वच प्रकरणांमध्ये जामीन देऊन त्यांना विशेष सवलती पुरविण्यात आल्याचा आरोप इतर नेत्यांनी देखील केला. तसेच या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही या पक्षांनी तसेच नेत्यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी पाकिस्तानात ठिकठिकाणी निदर्शने पार पडली. काही ठिकाणी निदर्शनांमध्ये हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे.

यामुळे पाकिस्तानात सरकारच्या बाजूने उभे राहणारे १३ राजकीय पक्ष व इम्रान खान यांचे समर्थक यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे सरकार व लष्कर एका बाजूला तर इम्रान खान व न्यायालय दुसऱ्या बाजूला असा फार मोठा पेच पाकिस्तानात निर्माण झालेला आहे. पाकिस्तानातील सरकारसमर्थकांची न्यायालयाविरोधात निदर्शनेसरकारच्या बाजूने व इम्रान खान यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला लक्ष्य करून इम्रान खान यांना दिलेल्या विशेष सवलतींवर सडकून टीका केली. सरन्यायाधीशांना बडतर्फ करण्यासाठी समितीची स्थापना केल्यानंतर त्यांच्यावरील दडपण अधिकच वाढल्याचे समोर येत आहे.

तर इम्रान खान यांनी आपल्या सुमारे सात हजार समर्थकांना ताब्यात घेऊन आपल्या पक्षावर बंदी टाकण्याची योजना तयार झाल्याचा ठपका ठेवला. तसेच आपल्याला दहा वर्षे तुरुंगात डांबण्याची तयारी पाकिस्तानी लष्कराने केली आहे, असा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे. पाकिस्तानी लष्करावरील इम्रान खान यांचे हे आरोप म्हणजे देशद्रोहाचा भाग असल्याची टीका त्यांचे विरोधक करीत आहेत. इम्रान खान पाकिस्तानच्या शत्रूंची भाषा बोलू लागल्याचा दावाही त्यांच्या विरोधकांनी केला आहे.

हिंदी English

 

leave a reply