इराणसमर्थक दहशतवादी इस्रायलवर हल्ले चढवू शकतात

- इस्रायलच्या वृत्तवाहिनीचा दावा

इस्रायलवर हल्ले

जेरूसलेम – इराक आणि येमेनमधील इराणसंलग्न दहशतवादी ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून इस्रायलवर हल्ले चढवू शकतात, अशी बातमी इस्रायलच्या वृत्तवाहिनीने दिली आहे. इस्रायलच्या लष्कराने नेहमीप्रमाणे यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गाझापट्टी, लेबेनॉन, सिरियाच्या सीमेवर तैनात इस्रायलचे लष्करासाठी अलर्ट जारी करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इस्रायलच्या लष्कराने शुक्रवारी गाझापट्टी आणि लेबेनॉनच्या सीमेजवळ घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावले आहेत. इस्रायली माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी इस्रायलच्या उत्तर आणि पश्‍चिम सीमेजवळ घुसखोरीचे जोरदार प्रयत्न झाले. लेबेनॉनच्या ‘मनारा’ भागातून संशयितांनी इस्रायलची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण इस्रायली लष्कराने हवेत गोळीबार करून घुसखोरांना पिटाळून लावले. या घुसखोरीच्या घटनेनंतर दोन्हीकडच्या सीमेवरील गस्त वाढविण्यात आल्याचा दावा केला जातो.

पण इस्रायली वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने वेगळीच माहिती प्रसिद्ध केली आहे. इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी गट व येमेनमधील हौथी बंडखोर इस्रायलवर हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

leave a reply