कॅनडामध्ये निदर्शकांचे अपहृत बलोचींच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन

टोरांटो – ‘व्हेअर इज शब्बीर बलोच?, #रिलीज शब्बीर बलोच, ‘पाकिस्तानच्या लष्कराने बलोचींचा नरसंहार थांबवावा’ अशा आशयाचे फलक घेऊन कॅनडामधल्या पश्तू,सिंधी आणि बलोचींनी राजधानी टोरांटोमध्ये पाकिस्तानविरोधात निदर्शने केली. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी शब्बीरचे बलोचिस्तानमधून पाकिस्तानी लष्कराने अपहरण केले होते.

कॅनडा

निदर्शकांनी बलोचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वामधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध केला. तसेच शबीर बलोच व त्याच्यासह सर्व बेपत्ता विद्यार्थी आणि व्यक्तींच्या सुटकेची मागणी केली. तसेच बलोच, पश्तून आणि सिंध प्रांतात पाकिस्तान सरकारकडून सुरू असलेला अत्याचार थांबविण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे करण्यात आली . या प्रदर्शनात वर्ल्ड सिंधी कॉंग्रेस आणि पश्तुन तहफूज आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.

या प्रदर्शनात सहभागी झालेले जाफर यांनी सोशल मीडीयावरून या निदर्शनाची छायाचित्रे शेअर केली आणि बलोचिस्तानमध्ये सुरू असलेल्या अत्याचार संपविण्याची मागणी केली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी बलोच जनतेच्या हक्कासाठी शब्बीर बलोचसारखे विद्यार्थी आवाज उठवितात. पण पाकिस्तानचे लष्कर या विद्यार्थांना पकडून नेतात. जाफर यांनी पाकिस्तान लष्कराच्या या दडपशाहीचा निषेध व्यक्त करून बलोचिस्तानला स्वतंत्र करण्याची मागणी केली.

२०१६ साली शब्बीर बलोच या विद्यार्थाचे बलोचिस्तानच्या गोरकोप भागातून पाकिस्तानी लष्कराने अपहरण केले होते. रविवारी या घटनेला चार वर्ष झाली. शब्बीर अहमद बलोचिस्तान विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. शब्बीरने गोरकोपमध्ये ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ विरोधात (सीपीईसी) मोर्च्याचे आयोजन केले होते. पाकिस्तानी लष्कराने शबीरसह काही कार्यकर्त्यांना पकडले होते.

leave a reply