इंधनाच्या दरांमधील भडका आर्थिक मंदीला कारणीभूत ठरेल

- अमेरिकी विश्‍लेषकाचा इशारा

आर्थिक मंदीलावॉशिंग्टन/मॉस्को/लंडन – रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर कडाडत असून त्याचा भडका आर्थिक मंदीचे कारण ठरेल, असा इशारा अमेरिकी विश्‍लेषक पॉल सॅन्की यांनी दिला. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलमागे १२० डॉलर्सनजिक पोहोचले आहेत. रशिया-युक्रेन संकटावर तोडगा निघेपर्यंत ते १५० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत उसळू शकतात, असे भाकितही सॅन्की यांनी वर्तविले आहे. कच्च्या तेलापाठोपाठ गहू, मका, सोयाबीन तेल यांचे दर दशकातील विक्रमी स्तरावर गेले असून ऍल्युमिनिअम, निकेल यासारख्या धातूंच्या किंमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे.

रशिया-युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धाला एक आठवड्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. युद्धाची तीव्रता अधिक वाढत असल्याचे दिसत असून त्याचे गंभीर पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटताना दिसत आहेत. गुरुवारी कच्च्या तेलाचे दर सुरुवातीच्या सत्रातच पाच टक्क्यांहून अधिक उसळी घेऊन थेट १२० डॉलर्सपर्यंत गेले. लंडनमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये प्रति बॅरलमागे ११९.८४ डॉलर्सचा दर नोंदविण्यात आला. त्यानंतर दुपारपर्यंत कच्च्या तेलाचे दर ११६.५९ डॉलर्सपर्यंत खाली आले.

आर्थिक मंदीलाअमेरिकेतील व्यवहारांमध्ये ‘डब्ल्यूटीआय क्रूड’च्या दरांमध्ये ३.२६ टक्क्यांची वाढ होऊन प्रति बॅरलमागे ११४.२१ डॉलर्सचा दर नोंदविला गेला. कच्च्या तेलाच्या दरांमधील या वाढीने इंधनाचे दर गेल्या १० वर्षातील सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलमागे ११८ डॉलर्सवर गेले होते. कच्च्या तेलाच्या दरांमधील वाढीचा भडका पुढेही कायम राहिल, असा इशारा विश्‍लेषकांकडून देण्यात येत आहे.

अमेरिकी विश्‍लेषक पॉल सॅन्की यांनी, रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघेपर्यंत कच्च्या तेलाचे दर १५० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत कडाडू शकतात, असे बजावले आहे. तेलाच्या दरांमध्ये उडणार्‍या या भडक्याने आर्थिक मंदीलाकच्च्या तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता असून त्यातून आर्थिक मंदीची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंध लादल्यास कच्च्या तेलाच्या दराचा विस्फोट होऊन ते २०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जातील, असे भाकित ‘पॉवर द फ्युचर’ या कंपनीचे संचालक डॅनिअल टर्नर यांनी वर्तविले आहे.

कच्च्या तेलापाठोपाठ अमेरिका व युक्रेनमधील प्रमुख उत्पादन असलेल्या गव्हाच्या दरांमध्येही विक्रमी वाढ झाली आहे. बुधवारी झालेल्या व्यवहारांमध्ये गव्हाच्या दरांमध्ये सात टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सध्या गव्हाचे दर प्रति बुशेलमागे (२५.४ किलो) १०.५९ डॉलर्सवर गेले आहेत. गव्हापाठोपाठ मका तसेच सोयाबीन तेलाचे दरही दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. अन्नधान्यापाठोपाठ ऍल्युमिनिअम, निकेल यासारख्या धातूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली असून दोन्ही धातूंच्या किंमती ११ वर्षातील विक्रमी स्तरावर गेल्याचे सांगितले जाते.

leave a reply