वाढत्या महागाईमुळे ब्रिटनमध्ये दंगली भडकतील

- ब्रिटीश विश्लेषकाचा इशारा

लंडन – ब्रिटनमध्ये भडकलेल्या विक्रमी महागाईमुळे जनता होरपळत असून नागरिकांची जीवनशैलीच संकटात आली आहे. यामुळे ब्रिटनमध्ये असंतोषाला खतपाणी मिळून दंगलींचा भडका उडू शकतो, असा गंभीर इशारा मार्टिन लेविस या विश्लेषकाने दिला. ब्रिटनच्या पोलीसप्रमुखांनीही या वक्तव्याला दुजोरा दिला असून नजिकच्या काळात ब्रिटनमधील गुन्हेगारीत वाढ होऊ शकते, असे बजावले आहे. दरम्यान, बुधवारी ब्रिटनमधील महागाई निर्देशांकाने नऊ टक्क्यांची विक्रमी पातळी गाठल्याचे समोर आले. हा गेल्या 40 वर्षातील उच्चांक ठरला आहे.

वाढत्या महागाईमुळे ब्रिटनमध्ये दंगली भडकतील - ब्रिटीश विश्लेषकाचा इशारारशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करून युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना धडा शिकविण्याचा इशारा अमेरिका व ब्रिटनच्या नेतृत्त्वाने दिला होता. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा फटका रशियाला बसला असला तरी या निर्बंधांचे सर्वाधिक परिणाम पाश्चिमात्य देशांमधील जनतेलाच सहन करावे लागत आहेत. अमेरिका व ब्रिटनकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आर्थिक आकडेवारी याला दुजोरा देणारी ठरते. ब्रिटनमधील इंधन व ऊर्जेच्या किमतीत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दूध, साखर, चिकन यासह अन्नधान्याच्या दरांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक भर पडली आहे.

वाढत्या महागाईमुळे ब्रिटनमध्ये दंगली भडकतील - ब्रिटीश विश्लेषकाचा इशारात्यामुळे ब्रिटनमधील महागाई निर्देशांन 1982 सालानंतर प्रथमच नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे. ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली वाढ तसेच ब्रिटीश सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याचा महागाईवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. उलट या वर्षाच्या अखेरपर्यंत त्यात अधिकच भर पडण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका ब्रिटीश जनतेला बसला असून त्यांच्यासमोर ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ निर्माण झाल्याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

महागाईच्या वाढत्या भडक्यामुळे ब्रिटीश जनतेत निराशेची भावना निर्माण होऊन असंतोषाची स्थिती निर्माण होईल व त्याचे रुपांतर दंगलींमध्येही होऊ शकते, असे लेविस यांनी बजावले. सरकारने याकडे वेळीच लक्ष देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

leave a reply