रशियाकडून सैबेरियात नव्या ‘एअर डिफेन्स शिल्ड`ची उभारणी

‘एअर डिफेन्स शिल्ड`ची उभारणीमॉस्को – आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेन मुद्यावरून निर्माण झालेला तणाव चिघळत असतानाच रशियाने अतिपूर्वेकडील सैबेरियात नव्या ‘एअर डिफेन्स शिल्ड`ची उभारणी सुरू केली आहे. ‘रिपब्लिक ऑफ खकासिआ` भागात ही यंत्रणा उभारण्यात येत असून त्यात ‘पँटसिर-एस अँटी एअरक्राफ्ट मिसाईल` व ‘कॅनन सिस्टिम`चा समावेश आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने यासंदर्भात माहिती दिली.

सैबेरियाच्या पश्‍चिम भागात स्थित असलेला खकासिआ हा भाग नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. या भागात रशियातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्पही कार्यरत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सैबेरियाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून या भागातील नैसर्गिक साधनसंपत्ती व खनिजसंपत्तीवर आधारित प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारत व चीन यासारख्या देशांनी या भागातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे.

‘एअर डिफेन्स शिल्ड`ची उभारणीराष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या काही वर्षात रशियन संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणावरही भर दिला असून अतिपूर्वेकडील सैबेरियापासून व्होल्गा पर्यंतच्या भागात संरक्षणसज्जता वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात रशियाच्या सात प्रांतांमध्ये ‘एअर डिफेन्स ड्रिल्स` आयोजित करण्यात आली होती. यात एक हजारांहून अधिक जवान व 300 संरक्षणयंत्रणांचा समावेश होता. त्यानंतर रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनीही खकासिआला भेट दिली होती.

‘पँटसिर-एस अँटी एअरक्राफ्ट मिसाईल` ही छोटे लष्करी तळ व औद्योगिक उपक्रमांच्या सुरक्षेसाठी विकसित करण्यात आलेली यंत्रणा आहे. मोठ्या प्रमाणात ‘एअर डिफेन्स शिल्ड`ची उभारणीहोणाऱ्या हवाईहल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सहाय्यक यंत्रणा म्हणूनही या यंत्रणेचा वापर करण्यात येतो. येत्या काही महिन्यात ही यंत्रणा कार्यरत झालेली असेल, असे रशियन संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या यंत्रणेसह लष्कराची स्वतंत्र तुकडी तैनात करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

सैबेरियाव्यतिरिक्त उत्तरेकडील आर्क्टिक क्षेत्रातही रशियाने मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती वाढविली आहे. गेल्या काही वर्षात आर्क्टिकच्या विविध भागांमध्ये तीन संरक्षणतळ सक्रिय करण्यात आले असून या तळांवर प्रगत ‘एस-400 मिसाईल डिफेन्स` तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रेही तैनात करण्यात आली आहेत.

leave a reply