रशियाच्या एस-300 ने इस्रायली विमानांवर हल्ला केला होता

जेरूसलेम – रशिया आणि इस्रायलमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. इस्रायलने सिरियातील चढविलेले हवाई हल्ले रोखण्यासाठी रशियाने ‘एस-300’चा वापर केला होता, अशी कबुली इस्रायलने दिली आहे. काही दिवसांपूर्वी सिरियन माध्यमांमध्ये याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. पण इस्रायलच्या सरकारने याची कबुली दिल्यामुळे रशियाबरोबर मतभेद वाढल्याचे दिसत आहे.

syria-russia-s-300इस्रायलने सिरियात हवाई हल्ले थांबवावे, असे आवाहन रशियाने काही दिवसांपूर्वी केले होते. इस्रायलने सिरियातील ‘अल हमिदिया’ या रशियन लष्करी तळाजवळ चढविलेल्या हवाई हल्ल्यानंतर रशियाकडून ही प्रतिक्रिया आली होती. रशियाने इस्रायलचे सिरियातील हल्ले बेजबाबदार ठरविले होते. गेल्या महिन्यातही रशियाने इस्रायलच्या सिरियातील कारवाईवर जोरदार ताशेरे ओढले होते. याच सुमारास रशियाने इस्रायलच्या लढाऊ विमानांविरोधात हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

सिरियामध्ये रशियाची पॅँटसीर आणि एस-300 अशा दोन हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत. यापैकी पॅँटसीरची कमांड सिरियन लष्कराच्या ताब्यात आहे. तर एस-300चे पूर्ण नियंत्रण सिरियात तैनात रशियन लष्कराकडे आहे. त्यामुळे इस्रायलच्या लढाऊ विमानांवर थेट रशियानेच क्षेपणास्त्रे रोखल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply