दक्षिण कोरियाने अपहृत टँकरवरून राजकारण करू नये

- इराणने दक्षिण कोरियाला बजावले

अपहृततेहरान – पर्शियन आखातातून अपहरण केलेल्या आपल्या टँकरच्या सुटकेसाठी दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये झालेली चर्चा फिस्कटली आहे. दक्षिण कोरियाने या प्रकरणाचे राजकारण करू नये व इराणचा गोठित केलेला सात अब्ज डॉलर्सचा निधी आपल्या हवाली करावा, अशी मागणी इराणने केली आहे. दरम्यान, अपहृत केलेल्या टँकरच्या सुटकेसाठी दक्षिण कोरियाने रवाना केलेली विनाशिका होर्मुझच्या आखाताजवळ दाखल झाली आहे.

गेल्या आठवड्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी होर्मुझच्या आखातातून दक्षिण कोरियाचे जहाज ताब्यात घेतले होते. सौदी अरेबियाच्या अल-जुबैल बंदरातून इथेनॉल घेऊन निघालेल्या ‘हानकूक चेमी’ टँकरला घेरून रिव्होल्युशनरी अपहृतगार्ड्सच्या गस्तीनौकांनी सदर टँकर इराणमध्ये नेले होते. या जहाजाने पर्यावरणाची हानी केल्याचा आरोप इराणने केला होता. त्याचबरोबर या टँकरचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून सदर टँकर बंदार अब्बास बंदरावर तैनात केल्याची घोषणा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने केली होती.

दक्षिण कोरियन टँकरच्या अपहरणासाठी इराणने दिलेल्या कारणाचे सत्य पुढच्या काही तासातच समोर आले होते. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणचा सात अब्ज डॉलर्सचा निधी दक्षिण कोरियाच्या बँकांमध्ये गोठीत आहे. याआधीच इराणच्या निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण कोरियन बँकेतील गोठीत निधी मिळविण्यासाठी इराणने या टँकरचे अपहरण केल्याचे बोलले जात होते.अपहृत

रविवारी दक्षिण कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चोई जाँग-कून इराणमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर, सदर टँकरचा ताबा मिळवून वाटाघाटी प्रभावित करण्याचा इराणचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातो. पण सोमवारी पार पडलेल्या बैठकीत बँकेतील गोठविण्यात आलेला निधी मोकळा करणे आणि टँकरची सुटका करण्याबाबत कुठलाही निर्णय होऊ शकला नाही.

दरम्यान, इराणच्या ताब्यातील आपल्या टँकरच्या सुटकेसाठी दक्षिण कोरियाने या क्षेत्रात विनाशिका रवाना केली होती. स्पेशल फोर्सेसने सज्ज असलेली ही विनाशिका होर्मुझच्या आखाताजवळ दाखल झाली आहे. यामुळे इराणची अस्वस्थता वाढल्याचा दावा केला जातो.

leave a reply